गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळापासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतील २० खासदार मणिपूर दौऱ्यावर आहेत. यावरून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी इंडिया आघाडीसह काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. हा दिखावा असल्याची टीका अनुराग ठाकूर यांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“इंडिया आघाडीतील काही खासदार मणिपूरला गेले आहेत. हा फक्त दिखावा आहे. यांचं सरकार असताना मणिपूर जळत होते. कित्येक महिने मणिपूर बंद असायचे. पण, त्यावेळी यांचे नेते संसदेत एक शब्दही उच्चारत नव्हते. अनेकांचा मृत्यू झाल्यावर यांचे नेते भाष्य करायचे,” असं अनुराग ठाकूर यांनी म्हटलं.

“मणिपूरमधून आल्यावर इंडियाच्या खासदारांनी पश्चिम बंगालचा दौरा करावा. मणिपूर दौऱ्यात काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी सुद्धा आहेत. मग, पश्चिम बंगालमधील महिलांवर होणाऱ्या अत्यांचाराबद्दल त्यांचं मत काय? ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये सर्व काही ठीक सुरु आहे का? अधीर रंजन चौधरी इंडियातील खासदारांना पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर बोलावणार आहेत का?” असा सवाल अनुराग ठाकूर यांनी विचारला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central minister anurag thakur attacks india mps visit manipur ssa