रायपूर : छत्तीसगडमध्ये भाजपच्या ‘डबल इंजिन’ सरकारचे प्राधान्य महिलांच्या कल्याणाला आहे. आपल्या सरकारने देशातील तीन कोटी महिलांना ‘लखपती दीदी’ बनवण्याचा संकल्प केला आहे, असा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी व्यक्त केला. छत्तीसगडमधील महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी ‘महतारी वंदन’ योजनेचा दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रारंभ केल्यानंतर मोदी संबोधित करत होते.

हेही वाचा >>> आझमगढचं आजन्मगढ करू, मोदींची आणखी एक गॅरंटी

Ladki Bahin Yojana
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून ५ लाख लाभार्थ्यांना वगळले; या ‘निकषात’ बसणाऱ्या महिला योजनेतून बाहेर
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Maharashtra FM Ajit Pawar on state budget
राज्याच्या अर्थसंकल्पात ‘लाडक्या बहिणी’, सामान्य नागरिक केंद्रबिंदू; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा
income tax
छोटी…छोटी सी बात!
Suhas Hiremath , Karad, India culture,
दातृत्व अन् त्यागाची भारत देशाची संस्कृती, सुहास हिरेमठ यांचे गौरवोद्गार
बुलढाणा : कुंभमेळ्यात भाविक महिला बेपत्ता, संपर्क होईना, कुटुंबीय हवालदिल
In Khadakpada area of ​​Kalyan West transgender beaten woman and her little daughter for 20000
कल्याणमधील खडकपाडा येथे तृतीय पंथीयांकडून महिलेला मारहाण
Congress Manifesto
Congress Manifesto : महिलांना दरमहा अडीच हजार, ५०० रुपयांत सिलिंडर, अन् तरुणांना…; दिल्लीकरांसाठी काँग्रेसकडून आश्वासनांची खैरात!

मोदींनी रविवारी छत्तीसगडमध्ये ‘महतारी वंदन योजने’चे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले. या योजनेंतर्गत पात्र विवाहित महिलांना मासिक एक हजार रुपये मदत दिली जाईल. पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून दूरनियंत्रकाद्वारे ही योजना सुरू केली आणि ७० लाखांहून अधिक महिलांच्या बँक खात्यांमध्ये ६५५ कोटी रुपयांचा पहिला हप्ता हस्तांतरित केला. मी सध्या काशीतून बोलत आहे, असे सांगून मोदी म्हणाले की, ‘‘काल रात्री काशी विश्वेश्वराची पूजा करताना मी सर्व देशवासियांच्या कल्याणाची प्रार्थना केली. आज मला बाबा विश्वनाथांच्या काशी या पवित्र नगरीतून तुम्हा सर्वांशी बोलण्याची संधी मिळाली आहे. या पवित्र नगरीतून एक हजार रुपये तुमच्या खात्यात पोहोचत आहेत आणि परमशक्ती भोलानाथ विश्वेश्वराचा आशीर्वाद आहे. आता हे पैसे दरमहा पात्र महिलांच्या खात्यात कोणत्याही अडचणीशिवाय येत राहतील, याची हमी देत आहे’’, असे त्यांनी सांगितले. जेव्हा माता-भगिनी सशक्त होतात, तेव्हा अवघे कुटुंब सशक्त होते असा विश्वास मोदी यांनी यावेळी व्यकत केला.

Story img Loader