नवी दिल्ली : आधार कार्डधारकांनी त्यांचा आधार क्रमांकाचा तपशील कुणालाही देताना सर्वसाधारण विवेक वापरावा, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आधार कार्डाच्या तपशिलाचा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे लोकांनी त्यांच्या आधार कार्डाच्या छायाप्रती कुठल्याही संस्थेला देऊ नयेत, असा सल्ला देणारे निवेदन यूएडीएआयने २७ मे रोजी जारी केले होते. त्यावर स्पष्टीकरण देताना केंद्र सरकारने वरील सूचना केली आहे.

‘यूएडीएआयच्या बंगळूरु प्रादेशिक कार्यालयाने २७ मे रोजी जारी केलेल्या निवेदनाच्या संदर्भात हे स्पष्टीकरण देण्यात येत आहे. फोटोशॉप केलेल्या आधार कार्डाचा गैरवापर करण्याचा प्रयत्न झाल्याच्या संदर्भात त्यांनी ते जारी केले होते, असे कळले आहे. लोकांनी त्यांच्या आधार कार्डाची छायाप्रत कुठल्याही संस्थेला देऊ नये, कारण त्याचा गैरवापर होऊ शकतो असा सल्ला या निवेदनात देण्यात आला होता. पर्याय म्हणून, आधार क्रमांकाचे केवळ अखेरचे चार आकडे दर्शवणारे झाकलेले आधार कार्ड वापरले जाऊ शकते’, असे सरकारने सांगितले.

 ‘तथापि, या निवेदनाचा चुकीचा अर्थ लावला जाण्याची शक्यता लक्षात घेता, ते तत्काळ प्रभावाने मागे घेण्यात येत आहे. आधार यंत्रणेत आधारधारकाची ओळख व गोपनीयता यांचे संरक्षण करण्यासाठी पुरेशी उपाययोजना करण्यात आली आहे. कार्डधारकांनी त्यांचा १२ आकडी ओळख क्रमांक कुणालाही देताना सामान्य विवेक वापरावी’, असेही सरकारने स्पष्टीकरणात म्हटले आहे.