प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम साजरा करताना नक्षलवाद्यांकडून कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी अधिक दक्षता घ्यावी, अशा सूचना केंद्र सरकारने नक्षलग्रस्त राज्यांना दिल्या आहेत.भाकपच्या (माओवादी) वतीने  २६ जानेवारी हा काळा दिवस म्हणून पाळण्यात येतो.
त्या दिवशी बिहार, झारखंड, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि ओदिशा येथे नक्षलवादी फुटिरतावादी कारवाया करण्याची शक्यता आहे, असा इशारा केंद्रीय गृहमंत्रालयाने दिला आहे.
नक्षलवादी संघटना हिंसाचार घडवतील आणि भूसुरुंग पेरतील आणि सुरक्षा अधिकाऱ्यांना लक्ष्य करतील, असा सावधानतेचा इशाराही देण्यात आला आहे. खबरदारी घेण्यासाठी संवेदनाक्षम ठिकाणे, बाजारपेठा, औद्योगिक आस्थापना, रेल्वेमार्ग आदी ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्याची सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Story img Loader