नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या पाश्र्वभूमीवर राज्यातील अभिनव भारत या हिंदुत्ववादी संघटनेवर बंदी घालण्याची राज्य सरकारची मागणी गुरुवारी केंद्र सरकारने फेटाळून लावली. २००८ मध्ये मालेगाव येथे झालेल्या स्फोटामध्ये ‘अभिनव’ चा हात असल्याचा आरोप केला जात होता. परंतु केंद्रीय गृह मंत्रालयाने हा आरोपही फेटाळून लावताना गेल्या काही वर्षांत ‘अभिनव भारत’ ही संघटना कोणत्याही दहशतवादी किंवा देशविघातक कृत्यात सहभागी असल्याचा पुरावा सापडलेला नाही, असे स्पष्ट केले. महाराष्ट्र राज्याच्या विनंतीवर भाष्य करण्यापूर्वी केंद्र सरकारने राष्ट्रीय तपास यंत्रणेसह गुप्तचर यंत्रणांचेही या संस्थेबाबतचे मत आजमावून पाहिले. राज्य दहशतवादविरोधी पथकाने अभिनव भारतवर बंदी घालण्याची राज्य सरकारला विनंती केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा