वाळूमाफियांवर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या दुर्गा शक्ती नागपाल यांना निलंबित का केले, असा सवाल करत या प्रकरणाचा तपशीलवार अहवाल सादर करा असा आदेश केंद्र सरकारने उत्तर प्रदेश सरकारला रविवारी दिला. नागपाल यांच्यावर कारवाई झाल्यापासून केंद्राने तिसऱ्यांदा उत्तर प्रदेश सरकारला पत्र पाठवले आहे.
बेकायदा वाळूउपशाविरोधात नागपाल यांनी कारवाई केली होती. मात्र, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. याची दखल घेत काँग्रेस अध्यक्ष  सोनिया गांधी यांनी याबाबत लक्ष घालण्याची सूचना पंतप्रधान मनमोहन सिंग यांना केली होती.  या पाश्र्वभूमीवर कार्मिक व कर्मचारी प्रशिक्षण खात्याचे राज्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनी नागपाल निलंबन प्रकरणाचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश उत्तर प्रदेश सरकारला एका पत्राद्वारे दिले.
पोलीस अधिकाऱ्याची बदली
राजस्थानातील जैसलमेर येथील काँग्रेसचे आमदार सालेह मोहम्मद
यांचे वडील गाझी फकीर यांच्याविरोधातील जुन्या गुन्ह्य़ाचा नव्याने तपास करू इच्छिणाऱ्या पोलीस अधीक्षक पंकज चौधरी यांची तातडीने बदली करण्यात आली. गाझी यांच्यावर समाजविघातक कारवायांत सहभागी असल्याचा आरोप आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा