नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी दलित चेहरा घेऊन भाजपला आव्हान देण्याची मोर्चेबांधणी ‘इंडिया’च्या मंगळवारी झालेल्या बैठकीत करण्यात आल्याचे समजते. त्यासाठी आघाडीतील नेत्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आहे. यावर अंतिम निर्णय झाला नसला तरी, या प्रस्तावाचे खरगेंनी पत्रकार परिषदेत थेट खंडनही केले नाही. ‘आधी एकत्र येऊन जिंकू, मग पंतप्रधानपदाचा विचार करू’, असे संदिग्ध उत्तर खरगेंनी दिले.

‘इंडिया’ महाआघाडीला निमंत्रक किंवा समन्वयक असला पाहिजे, असा मुद्दा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारच्या बैठकीपूर्वी मांडला होता. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी बैठकीत हाच मुद्दा उचलून पंतप्रधानपदासाठी दलित चेहरा देण्याचा देण्याचा प्रस्ताव मांडला. त्यासाठी त्यांनी खरगेंचे नाव सुचविले. यावर कोणीही आक्षेप घेतला नाही. उलट, द्रमुकचे प्रमुख व तामीळनाडूचे पंतप्रधान एम. के. स्टॅलिन, आपचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी खरगेंच्या नावाला पाठिंबा दिला. आघाडीतील २८ घटक पक्षांपैकी १६पेक्षा जास्त पक्षांनी खरगेंना पाठिंबा दिला असून यात शिवसेनेच्या ठाकरे गटाचाही समावेश असल्याचे समजते. बैठकीत खरगेंच्या संभाव्य पंतप्रधानपदाच्या चेहरा जाहीर करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली नसल्याने त्यावर पत्रकार परिषदेत खरगेंनी वा अन्य नेत्यांनी भाष्य करणे टाळले. ‘पंतप्रधान होण्यासाठी खासदारांची पुरेशी संख्या असली पाहिजे’, असे खरगे म्हणाले.

mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Pankaja Munde and Dhananjay Munde vs Suresh Dhas new controversy on political stage after elections
मुंडे बहीण-भाऊ विरुद्ध सुरेश धस, निवडणुकीनंतर राजकीय पटलावर नवा वाद
BJP wins in Maharashtra Haryana due to Narendra Modi influence
मोदींच्या प्रभावामुळे महाराष्ट्र, हरियाणात भाजपचा विजय; ‘दी मॅट्रीझ’ संस्थेच्या सर्वेक्षणात माहिती
who is Phangnon Konyak
Rahul Gandhi : राहुल गांधींनी प्रतिष्ठेला धक्का पोहचवाल्याचा आरोप करणाऱ्या भाजपाच्या महिला खासदार आहेत कोण?
Rohit Pawar On Salil Deshmukh Nagpur Ajit Pawar
Rohit Pawar : शरद पवार गटाच्या दोन नेत्यांनी घेतली अजित पवारांची भेट; पडद्यामागे काय घडतंय? रोहित पवार म्हणाले, “बरेचसे आमदार…”
Kapil Sharma reply troll claiming he insulted Atlee looks
ॲटलीच्या दिसण्यावरून कमेंट करण्याबद्दल कपिल शर्माने दिलं उत्तर; म्हणाला, “मेंढरासारखे कोणाचेही…”
India Avoid the Follow on With Bumrah Akashdeep and KL Rahul Ravindra Jadeja Partnership in IND vs AUS Gabba Test
IND vs AUS: भारताचा फॉलोऑन टळला! बुमराह-आकाशदीपच्या जोडीने जीवाची लावली बाजी, जडेजा-राहुलने रचला होता पाया

हेही वाचा >>>लोकशाही वाचली तर देश वाचेल! उद्धव ठाकरे यांचा इशारा

दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये मंगळवारी झालेली ‘इंडिया’ची ही चौथी बैठक होती. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांनंतर काँग्रेस आणि ‘इंडिया’तील सप, आप यांचे तीव्र मतभेद झाले होते. या पार्श्वभूमीवर ‘इंडिया’तील नेत्यांनी महाआघाडीला पुन्हा गती देण्याचा निर्णय घेतला आहे. बैठकीला काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जनता दलाचे प्रमुख व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव, तेजस्वी यादव, माकपचे महासचिव सीताराम येचुरी, उद्धव ठाकरे आदी २८ पक्षांचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित होते.      

जागावाटपासाठी अल्टिमेटम

जागावाटपासाठी ममता बॅनर्जी यांनी अल्टिमेटम दिला असून ३१ डिसेंबपर्यंत हा प्रश्न धसास लावण्यास सांगितले आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही हाच मुद्दा उपस्थित केला. पश्चिम बंगालमध्ये माकप व काँग्रेसची युती असून पश्चिम बंगालमध्ये माकप तृणमूल काँग्रेसशी आघाडी करण्यास तयार नाही. केरळमध्येही माकप व काँग्रेस एकमेकांविरोधात लढतील, असे चित्र आहे. दिल्ली, पंजाब व उत्तर प्रदेश या राज्यांतही जागावाटपावर आप व काँग्रेस तसेच सप व काँग्रेस यांच्यामध्ये एकमत झालेले नाही. जागावाटपाचा प्रश्न राज्यस्तरावर सोडवला जाईल, तसे न झाल्यास केंद्रीय स्तरावर नेत्यांमध्ये चर्चा होईल, असे खरगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

बैठकीतील निर्णय

– भाजपच्या ओबीसी, महिला, युवा धोरणाला पर्याय देण्याची रणनिती 

– लोकसभा निवडणुकीसाठी संयुक्त प्रचाराची ३० जानेवारीला सुरुवात – खासदार निलंबन व संसदेतील सुरक्षाभंग याबाबत २२ डिसेंबरला देशव्यापी निदर्शने 

– मतदानयंत्रांच्या विश्वासार्हतेवर शंका व्यक्त करून मुद्दा पुन्हा केंद्रीय निवडणूक आयोगासमोर मांडणार

– जागावाटपाचा प्रश्न तातडीने सोडवून देशव्यापी प्रचाराला गती

प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न

नरेंद्र मोदींसमोर उभे राहू शकतील असे एकमेव विश्वासार्ह, अनुभवी नेते खरगे हेच आहेत. दलित व आदिवासी हे काँग्रेसच्या पारंपरिक मतदार भाजपने जाणीवपूर्वक हिरावून घेतले आहेत. त्यासाठी दलित किंवा आदिवासी चेहऱ्याची काँग्रेसला गरज होती. खरगे ‘इंडिया’तील घटक पक्षांनाही आपलेसे वाटतात. रामनाथ कोिवद व द्रौपदी मुर्मू या भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांच्या विरोधात काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी निवडणूक लढविली होती. त्यामुळे काँग्रेस दलित व आदिवासी विरोधात असल्याचे चित्र भाजपने निर्माण केले. ही प्रतिमा बदलण्यासाठीही खरगे हेच नाव योग्य असल्याचे मानले जात आहे.

Story img Loader