Champai Soren Joins BJP Shivraj Singh Chouhan : झारखंड मुक्ती मोर्चाचे माजी वरिष्ठ नेते आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी आज (३० ऑगस्ट) भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे. झारखंडची राजधानी रांची येथील शहीद मैदानात भाजपाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान व आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांच्या प्रमुख उपस्थितीत चंपाई सोरेन यांनी भाजपात प्रवेश केला. या कार्यक्रमाला झारखंड भाजपाचे संघठन प्रभारी लक्ष्मीकांत वाजपाई, भाजपा प्रदेशाध्यक्ष बाबूलाल मरांडी, माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांच्यासह पक्षातील अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.

दरम्यान, पक्षप्रवेशानंतर चंपाई सोरेन यांनी त्यांच्या आगामी योजनेवर भाष्य केलं. पक्षप्रवेश सोहळ्यानंतर सोरेन यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी आगामी योजनेबाबत विचारलं. तेव्हा ते म्हणाले, “मी आधीच सांगितलं की आमचं संपूर्ण लक्ष झारखंडच्या विकासावर असेल. राज्यात बांगलादेशी लोकांची होणारी घुसखोरी आम्ही निश्चितपणे थोबवणार”. दरम्यान, सोरेन यांना विचारण्यात आलं की भाजपामध्ये तुम्हाला कोणती जबाबदारी दिली जाणार आहे? त्यावर सोरेन म्हणाले, “तो निर्णय पक्ष घेईल. पक्ष मला जी जबाबदारी सोपवेल ते काम मी ईमानदारीने करेन”.

Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
Yashomati Thakur's allegations on Sunil Karhade of NCPSP.
Yashomati Thakur: “शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याकडून २५ लाखांची मागणी,” काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा आरोप
Battle of prestige for both NCP sharad pawar and ajit pawar in Pimpri Assembly Constituency
बालेकिल्ल्यात दोन्ही ‘राष्ट्रवादी’साठी प्रतिष्ठेची लढाई
Jitendra Awhad comment on Ajit Pawar,
साहेब जातात कधी याची वाटच अजित पवार पाहत आहेत, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप
Sharad Pawar on Gautam Adani meeting
Sharad Pawar: “होय, बैठक झाली होती, पण…”, NCP-BJP एकत्र येण्यासाठी अदाणींच्या घरी बैठक; अजित पवारांच्या दाव्यावर शरद पवार म्हणाले…

हे ही वाचा >> Narendra Modi : “प्रायश्चित्त अटळ आहे, भ्रष्टाचाराला महाराजांनी…”, पंतप्रधान मोदींच्या माफीनंतर शरद पवार गटाचा टोला

समाजमाध्यमांवर पोस्ट करत व्यक्त होती नाराजी

चंपाई सोरेन यांनी काही दिवसांपूर्वी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत झारखंड मुक्ती मोर्चा या त्यांच्या आधीच्या पक्षावर नाराजी व्यक्त होती. आपल्याला अपमानास्पद पद्धतीने मुख्यमंत्री पदावरून काढल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की “सत्ता मिळाल्यावर बाबा तिलका मांझी, भगवान बिरसा मुंडा आणि सिदो-कान्हू यांसारख्या वीरांना आदरांजली अर्पण करून मी राज्याची सेवा करण्याचा संकल्प केला होता. मी कधीही कोणावरही अन्याय केला नाही किंवा होऊसुद्धा दिला नाही. हूलच्या दुसऱ्या दिवशी माझे पुढील दोन दिवसांचे सर्व कार्यक्रम पक्षनेतृत्वाने पुढे ढकलले. यापैकी एक कार्यक्रम दुमका येथे, तर दुसरा पीजीटी शिक्षकांना नियुक्ती पत्र वाटपाचा होता. याबाबत मी पक्षातील लोकांना विचारल्यावर त्यांनी मला सांगितलं की ३ जुलै रोजी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे, तोवर तुम्ही मुख्यमंत्री म्हणून कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नसल्याचं सांगण्यात आलं”.

हे ही वाचा >> पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले…

चंपाई सोरेन म्हणाले, “मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने रद्द करण्यापेक्षा लोकशाहीत दुसरा कुठला मोठा अपमान असू शकतो. या अपमानास्पद वागणुकीमुळे मी माझ्या अश्रूंवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. ज्या पक्षासाठी मी माझं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं, त्याचं पक्षात माझं काय अस्तित्व आहे असा मला प्रश्न पडला. पक्षाने माझा इतका अपमान केल्यानंतर आणि मी तो सहन केल्यानंतर मला पर्यायी मार्ग शोधणं भाग पडलं”.