साहस पर्यटनाला प्रोत्साहन देऊन जम्मू-काश्मीरला पर्यटनाचे गतवैभव प्राप्त करून देण्याची राज्य सरकारची अतीव इच्छा असल्याचे सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी सरकारने परिणामकारक पावले उचलली आहेत. राज्याला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्याचे सरकारने ठरविले आहे.
साहस पर्यटनामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे स्पष्ट करून राज्याचे पर्यटनमंत्री गुलाम अहमद मीर यांनी धार्मिक पर्यटनावरही लक्ष केंद्रित करण्याचे ठरविण्यात आल्याचे स्पष्ट केले.
साहसी पर्यटन उद्योगसमूहातून प्रशिक्षित आणि कुशल व्यक्ती अधिकाधिक लाभ उठवू शकतील, मात्र पर्यटनाच्या ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम होऊ न देण्याची खबरदारी घ्यावी लागेल. संतुलित विकास आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्यास सरकार बांधील असल्याचेही मीर यांनी पत्रकारांना सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

adventure

adventure