पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’च्या ९३ व्या भागात देशवासीयांना संबोधित केले. यावेळी मोदी यांनी योग, खेळ, शिक्षण, भारतातील विविधता, पर्यटन, पर्यावरण अशा विषयांवर भाष्य केले. त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचाही उल्लेख केला. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी देशातील एक महत्त्वाच्या विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव दिले जाईल, अशी घोषणा केली.
हेही वाचा >>> चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांना पदच्यूत केलं?, सोशल मीडियावरील अफवांवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे मौन
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षामध्ये २८ सप्टेंबर हा विशेष दिवस आहे. या दिवशी आपण थोर देशभक्त शहीद भगतसिंग यांची जयंती साजरी करू. भगतसिंग यांच्या जयंतीच्या अगोदर भारत सरकारने त्यांना श्रद्धांजली म्हणून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चंदीगड विमानतळाचे नाव बदलून या विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव दिले जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
हेही वाचा >>> “काँग्रेसने ७० वर्षांत काय केलं” पंतप्रधानांच्या प्रश्नावर राहुल गांधींचे सडेतोड उत्तर, म्हणाले, ‘आम्ही भारताला…’
पुढे बोलताना त्यांनी योगविद्येवर भाष्य केले. शारीरिक आणि मानकसिक स्वास्थ्यासाठी योगा खूप महत्त्वाचे आहे, हे संपूर्ण जगाने स्वीकारले आहे. मधुमेह आणि रक्तदाबाच्या अडचणींवर मात करण्यासाठी योग खूप फायदेशीर ठरतो. योगाचे हेच महत्त्व ओळखून संयुक्त राष्ट्राने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवलेले आहे, असे मोदी म्हणाले.
हेही वाचा >>> रुपयाच्या गटांगळ्या, पण निर्मला सीतारमण म्हणतात, “इतर देशांच्या तुलनेत…!”
आपल्या देशात सध्या उत्सवांचे पर्व आहे. उद्या नवरात्रीचा पहिला दिवस आहे. या नऊ दिवसांत आपण उपवास करतो तसेच काही नियम पाळतो. नवरात्रीनंतर विजयादशमी साजरी केली जाईल. या सणांमध्ये भक्तीभाव आध्यात्मिकतेसोबतच अनेक संदेश असतात, असेही मोदी म्हणाले.