नवी दिल्ली : चंडीगड महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने सर्वाधिक जागा मिळवून सत्ताधारी भाजपला धक्का दिला़  पालिकेतील ३५ जागांपैकी १४ जागा अरिवद केजरीवाल यांच्या पक्षाने जिंकल्या असून ‘आप’च्या या यशामुळे पंजाबमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतील चुरस वाढली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आम आदमी पक्षाने पहिल्यांदाच चंडीगडच्या महापालिका निवडणुकीत उमेदवार उभे केले होते. केंद्रशासित प्रदेशातील मतदारांसमोर प्रशासनाचे ‘दिल्ली प्रारुपा’ मांडून ‘आप’ने महापालिका ताब्यात घेतल्याचे मानले जात आहे. गुजरातमध्येही अन्य महापालिकांमध्ये यश मिळाले नसले तरी सुरत महापालिकेत ‘आप’ने २८ टक्के मते घेऊन २७ जागा जिंकल्या होत्या. हाच कित्ता  चंडीगड  महापालिकेत ‘आप’ने गिरवला असून इथे ४० टक्के मते मिळवली. या महापालिकेवरील वर्चस्वासाठी भाजप वा काँग्रेस यांच्यात संघर्ष होत होता. यावेळी मात्र आप आणि भाजप यांच्यात चढाओढ झाल्याचे दिसून आले. आपने १४, भाजपने १२, काँग्रेसने ८ तर, अकाली दलाने एक जागा जिंकली. या निवडणुकीत भाजपचे महापौर रविकांत शर्मा यांनाही ‘आप’च्या उमेदवाराने धूळ चारली. शर्मा ८२८ मतांनी पराभूत झाले.  चंडीगड  महापालिकेतील ‘आप’ला मिळालेले यश ही पंजाबमधील बदलाची नांदी असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे सर्वेसर्वा अरिवद केजरीवाल म्हणाले.

भाजपच्या भ्रष्ट प्रशासनाला चंदिगढच्या मतदारांनी नाकारल्याचा दावाही केजरीवाल यांनी केला.

अमिरदर-भाजप युती अधिकृत 

दरम्यान, पंजाबचे माजी मुख्यमंत्री व पंजाब लोक काँग्रेसचे प्रमुख अमिरदर सिंह आणि शिरोमणी अकाली दल (संयुक्त)चे प्रमुख सुखदेवसिंह ढिंडसा यांच्याशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी दिल्लीत चर्चा केली. त्यानंतर भाजपने अमरसिंह व ढिंडसा यांच्या पक्षांशी युती करण्याचा निर्णय घेतला. पंजाबमधील विधानसभा निवडणुकीसाठी तिन्ही पक्ष सत्ताधारी काँग्रेस, अकाली दल आणि ‘’आप’’ विरोधात लढतील. एकूण ११७ जागांपैकी सुमारे ७० जागा भाजपला, पंजाब लोक काँग्रेसला ३० जागा व उर्वरित जागा ढिंडसांच्या पक्षाला दिल्या जाण्याची शक्यता आहे.