चंदिगढमध्ये भटक्या कुत्र्यांना खायला देणाऱ्या तरुणीला कारने धडक दिल्याची धक्कादायक घटना १६ जानेवारी रोजी समोर आली . या घटनेनंतर संपूर्ण देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. अपघातग्रस्त तरुणीचे नाव तेजस्विता असून सध्या या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेसंदर्भात पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. मात्र तेजस्विताच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे.
हेही वाचा >>> लेफ्टनंट गव्हर्नर म्हणजे काय मुख्याध्यापक नाहीत, हो की नाही एवढंच सांगा; केजरीवाल उतरले रस्त्यावर
सीसीटीव्ही फूटेज दिल्यानंतरच तक्रार दाखल
तेजस्विता या तरुणीला कारने धडक दिल्याच्या घटनेनंतर दोन दिवसांनी पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. याच कारणामुळे तिच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केला आहे. “आम्ही या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज मिळवले. ते फूटेज आम्ही स्वत: पोलिसांना दिले. त्यानंतरच पोलिसांनी तक्रार दाखल केली,” असे तेजस्विताचे कुटुंबीय म्हणाले आहेत.
घटनेचा व्हिडीओ आला समोर
चंदिगढमधील तरुणीला एका कारने धडक दिल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. याच घटनेचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे. यामध्ये तरुणी भटक्या कुत्र्यांना खायला देत असल्याचे दिसत आहे. याच वेळी मागून थार गाडीने तिला धडक दिली आहे. या घटनेनंतर तरुणीच्या आजूबाजूचे श्वान पळून गले आहेत. या घटनेमध्ये तेजस्विता गंभीर जखमी झाली आहे.
हेही वाचा >>> हिंदू, मुस्लीम अन् आता उर्फी जावेदने शीख धर्माबद्दल केलं ट्वीट; म्हणाली, “मी धार्मिक नाही पण…”
तेजस्विताच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना मागील आठवड्यात शनिवारी रात्री घडली होती. तेजस्विता आपली आईसोबत रोज रात्री भटक्या कुत्र्यांना खायला देत असे. नेहमीप्रमाणे शनिवारीदेखील तेजस्विता आपल्या आईसोबत कुत्र्यांना खायला देत होती. मात्र यावेळी मागून भरधाव वेगात एक कार आली. या कारने तेजस्विताला धडक दिली. तसेच अपघातानंतर न थांबता हा कारचालक थेट निघून गेला.
हेही वाचा >>> न्यायवृंद नियुक्त्यांवरून न्यायालय-केंद्र नवा वाद; नियुक्ती प्रक्रियेत ‘सरकारी’ प्रतिनिधीच्या समावेशाची मागणी
अपघाताच्या घटनेनंतर तेजस्विताचा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तेजस्विताच्या आईने तिच्या कुटुंबीयांना फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर तेजस्विताला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तेजस्वितावर उपचार सुरू असून तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे म्हटले जात आहे.