Chandrababu Naidu Swearing-in Ceremony Updates : नुकत्याच झालेल्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत एन. चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देशम पार्टीने बहुमत मिळवलं आहे. टीडीपीने ही निवडणुक प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेते पवन कल्याण आणि भाजपाबरोबरच्या युतीत लढली होती. बहुमत मिळवल्यानंतर या तीन पक्षांच्या युतीने आज राज्यात सरकार स्थापन केलं असून चंद्राबाबू नायडू यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. नायडू यांच्याबरोबर अभिनेते पवन कल्याण यांनीदेखील कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. नायडू यांनी चौथ्यांदा आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तसेच ते या राज्याचे १३ वे मुख्यमंत्री झाले आहेत. विजयवाडा येथील गन्नावरम विमानतळाजवळ केसरपल्ली आयटी पार्कमध्ये आज (१२ जून) सकाळी हा शपथविधी सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत राज्यात टीडीपी, जनसेना पार्टी आणि भाजपाने इंडिया आघाडीचा पराभव केला आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसला धूळ चारली आहे. विधानसभा निवडणुकीत नायडूंच्या टीडीपीने १७५ पैकी १३५ जागा जिंकल्या. तर पवन कल्याण यांच्या जनसेना पार्टीने २१ जागांवर विजय मिळवला. यासह भाजपाला आठ जागा जिंकता आल्या. तिन्ही पक्षांनी मिळून राज्यात १६४ जागा जिंकल्या. तर, जगन मोहन रेड्डींच्या वायएसआर काँग्रेसला केवळ ११ जागा जिंकता आल्या.
विजयवाडा येथे मंगळवारी एनडीएच्या सर्व आमदारांची बैठक झाली. या बैठकीत चंद्राबाबू नायडू यांची एनडीएचे गटनेते म्हणून निवड झाली. त्यानंतर आज त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नायडू यांच्याबरोबर एनडीएतील एकूण २४ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये टीडीपीचे २०, जनसेना पार्टीचे २१ आणि भाजपाच्या एका नेत्याचा समावेश आहे.
हे ही वाचा >> १८ व्या लोकसभेचं २४ जूनपासून पहिलं अधिवेशन! अध्यक्षांच्या निवडीसह ‘हे’ मुद्दे अजेंड्यावर!
आंध्र प्रदेशच्या नवीन कॅबिनेटमधील मंत्र्यांची नावे
कोनिडेल पवन कल्याण
किंजरापू अच्छेनायडू
कुल्ली रवींद्र
नादेंदल मनोहर
पी. नारायण
वंगलपुडी अनिता
सत्यकुमार यादव
निम्मल रामानायडु
एन. एम. डी. फारुक
अनम रामनारायण रेड्डी
पयावल्लु केशव
अंगनी सत्यप्रसाद
कुलुसु पार्थसारधी
डोला बलवीरंजनेय स्वामी
गुट्टीपट्टी रवr
कंदुल दुर्गेश
गुम्मिडी संध्या राणी
जनार्दन रेड्डी
टीजी भरत
वसंतमशेट्टी सुभाष
कुण्डपल्ली श्रीनिवास
मण्डीपल्ली राम प्रसाद
नारा लोकेश