तेलुगु देसम पक्षाचा विस्तार होऊन तो राष्ट्रीय पक्ष व्हावा अशी अपेक्षा असल्याचे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी स्पष्ट केले.
आंध्रबरोबरच तेलंगणमध्ये पक्षाची कामगिरी चांगली आहे. आता पक्षाचा देशव्यापी विस्तार व्हायला हवा अशी सूचना त्यांनी पक्षाच्या बैठकीत केली. तेलंगणमध्ये काही जण पक्षात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप केला. तेलंगणमध्ये जे सत्तेत आहेत त्यांना आमचे यश पचत नाही असा टोला त्यांनी तेलंगण राष्ट्र समितीला लगावला.

Story img Loader