Chandrayaan-2 Moon Landing : श्रीहरिकोटाच्या प्रक्षेपण केंद्रावरून २२ जुलै रोजी झेपावलेले ‘चांद्रयान-२’ अनेक महत्त्वाचे टप्पे पार पाडत चंद्राजवळ पोहोचले. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे विक्रम लँडरचा संपर्क तुटला. त्यामुळे भारतीयांचा थोडासा हिरमोड झाला. पण ISRO च्या प्रयोगाचे आणि प्रयत्नांचे साऱ्यांनी तोंडभरून कौतुक केले. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यानेही ISRO च्या कामगिरीचे कौतुक करत शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांना सलाम केला.

“ISRO वो है, जहा मुश्किले शर्मिंदा है”; सेहवागने जिंकली नेटकऱ्यांची मनं

भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा याला चंद्रावरून भारत कसा दिसतो असं विचारलं तेव्हा त्याने “सारे जहाँ से अच्छा, हिंदुस्थान हमारा” असं उत्तर दिलं होतं. मला खात्री आहे की इस्त्रो केवळ चंद्रावरच नव्हे तर आकाशगंगेत पोहोचेल आणि त्यावेळीही आपण अभिमानाने “सारे जहाँ से अच्छा, हिंदुस्थान हमारा” म्हणू, ISRO ला सलाम! जय हिंद!!”

दरम्यान, या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी संपूर्ण देश क्षणांक्षणांचं अपडेट पाहत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संपूर्ण देशाने शनिवारी रात्रभर जागून अनुभव घेतला. मात्र, विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून २.१ किलोमीटपर्यंत पोहोचले असताना संपर्क तुटला. विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यानंतर शास्त्रज्ञांबरोबरच संपूर्ण देशाचा श्वास रोखला गेला. यावेळी उपस्थित असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांना धीर दिला. मात्र रविवारी विक्रम लँडरचे ठिकाण समजले असल्याचे ISRO कडून सांगण्यात आले आहे.

“प्रत्येक प्रयोग नवीन गोष्ट शिकवतो”; विराटकडून ISRO चं कौतुक

या मोहिमेबद्दल पंतप्रधान मोदी यांनीही ISRO चे कौतुक केले आहे. “चांद्रयान २ च्या संपूर्ण अभियाना दरम्यान देश अनेकदा आनंदित झाला. आताही आपले ऑर्बिटर मोठ्या दिमाखात चंद्राची परिक्रमा करत आहे. भारत जगातील महत्त्वाच्या अवकाश शक्तींपैकी एक आहे. विज्ञानात केलेले सर्व प्रयोग आपल्या अमर्याद धाडसाची आठवण देतात. चांद्रयान-२ च्या अंतिम चरणाचा निकाल आमल्या अपेक्षेनुसार आला नाही, मात्र चांद्रयानाचा संपूर्ण प्रवास अतिशय उत्तम होता”, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ISRO च्या प्रयत्नांचे कौतुक केले.

Story img Loader