पीटीआय, बंगळूरु
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
भारताच्या महत्त्वाकांक्षी ‘चांद्रयान-३’ या अंतराळ यानाने बुधवारी महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला. हे यान बुधवारी सकाळी ८.३० वाजता चंद्राच्या पाचव्या व अखेरच्या कक्षेत पोहोचले असून चंद्राच्या पृष्ठभागाच्या अगदी जवळ आले आहे, अशी माहिती भारतीय अंतराळ संस्थेने दिली.चांद्रयान-३ ने चौथ्यांदा आपली कक्षा बदलली असून आता ते चंद्राभोवती १५३ किमी ७ १६३ किमी या कक्षेत फिरत आहे.
चांद्रयान-३ या अंतराळ यानातील प्रोपल्शन मॉडय़ूल आणि लँडर मॉडय़ूल एकमेकांपासून वेगळी होण्याच्या तयारीत आहेत. गुरुवारी, १७ ऑगस्ट रोजी ते वेगळे करण्याचे नियोजित करण्यात आल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले. चांद्रयान-३च्या लँडरमध्ये रोव्हर जोडण्यात आले असून या दोन्हीला मिळून लँडर मॉडय़ूल बोलले जाते. २३ ऑगस्ट रोजी चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण धुव्रावर अलगद उतरणार आहे.
First published on: 17-08-2023 at 01:41 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrayaan 3 in final lunar orbit amy