भारताने पाठवलेलं चांद्रयान-३ हे अवकाशयान काल (२४ ऑगस्ट) चंद्रावर यशस्वीरित्या उतरलं. विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं. इस्रोने चंद्रावर आपलं यान उतरवून भारताला एलिट स्पेस क्लबमध्ये स्थान मिळवून दिलं आहे. या कामगिरीमुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंतराळयान उतरवणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. चांद्रयान चंद्रावर उतरल्यानंतर काल (२३ ऑगस्ट) रात्री विक्रम लँडरने तिथले फोटो आणि आपण चंद्रावर पोहोचल्याचा संदेश इस्रोच्या बंगळुरू येथील मुख्यालयाला पाठवला.

भारताच्या या चांद्रमोहिमेत आता पुढचे टप्पे काय असणार आहेत? विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर तिथे काय कय करणार? २४ तासांनंतर तिथली परिस्थिती कशी आहे? असे अनेक प्रश्न लोकांना पडले आहेत. याची उत्तरं इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ आणि इस्रोने दिली आहेत.

Woman Shares Heartfelt Story on Why Mother's Home Matters After Husband's Kidney Failure
“लग्नानंतर एका वर्षात माझ्या नवऱ्याच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या..” महिलेनी सांगितले आयुष्यात माहेर का महत्त्वाचे? पाहा VIDEO
22nd October Rashi Bhavishya In Marathi
२२ ऑक्टोबर पंचांग: जन्मराशीनुसार आज कर्तुत्वाला मिळेल चांगला…
bricks in russia narendra modi
BRICS Summit: ब्रिक्स म्हणजे काय? यंदाची शिखर परिषद भारतासाठी महत्त्वाची का आहे?
Preparation Strategy for Competitive Exams
करिअर मंत्र
supreme court Tightening the law on child pornography
यूपीएससी सूत्र : चाइल्ड पोर्नोग्राफीसंदर्भात सुप्रीम कोर्टाचा निर्णय अन् ‘भविष्यातील युद्धतंत्र’ अभ्यासक्रम, वाचा सविस्तर…
How important is sevens table in life | Inspirational Video
आयुष्यात सातचा पाढा किती महत्त्वाचा आहे! प्रत्येक आकडा सांगतो वयाचे महत्त्व, VIDEO एकदा पाहाच
Akshay Kumar's Health and Fitness Mantra: Balance Over Pressure
Akshay Kumar : “स्वत:वर प्रेशर घेऊन मला आरोग्य खराब करायचे नाही…” अक्षय कुमारसाठी आरोग्य आणि फिटनेस का महत्त्वाचे?
Loksatta chatusutra Supreme Court 21st Article Krishna Iyer UAPA
चतुःसूत्र: जामीन हा नियम, तुरुंगवास अपवाद!

इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ म्हणाले, या चांद्रमोहिमेत आता पुढचे १४ दिवस खूप महत्त्वाचे असणार आहेत. आपला सहा चाकी रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर फिरेल, तिथे वेगवेगळे प्रयोग केले जातील. चंद्रावरील एक दिवस हा पृथ्वीवरील १४ दिवसांच्या बरोबरीचा असतो. तिथे संशोधनासाठी विक्रम लँडरबरोबर पाच पेलोड पाठवले आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाणी आणि खनिजे असल्याचा दावा आतापर्यंत अनेक अंतराळ संस्थांनी केले आहेत. आपल्यालाही तशी शक्यता जाणवते. त्यामुळेच आपला प्रज्ञान रोव्हर तिथे त्यासंबंधीचं संशोधन करेल आणि इस्रोला यासंबंधीची माहिती पाठवेल.

हे ही वाचा >> “…म्हणून आम्ही दक्षिण ध्रुव निवडला”, इस्रो प्रमुखांनी सांगितलं Chandrayaan 3 मोहिमेचं मुख्य उद्दिष्ट

एस. सोमनाथ म्हणाले, लँडिंगची जी जागा ठरली होती, विक्रम लँडरने त्याच ठिकाणी यशस्वी लँडिंग केलं आहे. लँडरमधून रोव्हर बाहेर आला आहे. तो आता चंद्राच्या पृष्ठभागावर फिरत आहे. दरम्यान, इस्रोने एक ट्वीट करून चांद्रयान ३ मोहिमेची आतापर्यंतची (२४ तासांनंतरची) माहिती दिली आहे. मोहिमेची सर्व कामं वेळापत्रकानुसार होत आहेत. सर्व यंत्रणा सुरळीत आहेत. रोव्हर मोबिलिटी ऑपरेशन्स सुरू झाले आहेत. लँडर मॉड्यूलचे तीन पेलोड सुरू झाले आहेत. प्रोपल्शन मॉड्यूलवरील शेप पेलोड रविवारीच सुरू केला होता.