Chandrayaan 3 Pragyan Rover : भारताची चांद्रमोहीम यशस्वी ठरली आहे. विक्रम लँडरच्या मदतीने इस्रोने चांद्रयान-३ हे चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरवलं आहे. त्यानंतर आता विक्रम लँडर दररोज चंद्रावरील नवनवीन अपडेट्स देत आहे. चंद्रावरील फोटो, प्रज्ञान रोव्हरचे व्हिडीओ यासह इतर माहिती इस्रोच्या मुख्यालयाला मिळत आहे. दरम्यान, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) चांद्रयान-३ च्या विक्रम लँडरने चंद्रावरील तापमानाची माहिती दिली आहे. विक्रम लँडरच्या मॉडय़ूलवरील ‘चेस्ट’ पेलोडद्वारे चंद्राच्या पृष्ठभागावरील मोजलेल्या तापमानातील फरकाचा आलेख रविवारी सायंकाळी प्रसिद्ध करण्यात आला. ‘‘विक्रम लँडरवरील ‘चेस्ट’ पेलोडने तापमानाबाबत दिलेली ही पहिली माहिती आहे’’ असं इस्रोने म्हटलं आहे.

पेलोडवर तापमान मोजण्यासाठी एक यंत्र असून ते पृष्ठभागाच्या १० सेंटीमीटर खोल जाण्यास सक्षम आहे. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार ‘चंद्र सरफेस थर्मो फिजिकल एक्सपेरिमेंट’ने (चेस्ट) चंद्राच्या पृष्ठभागावरील तापमानाची माहिती घेण्यासाठी दक्षिण ध्रुव्राच्या पृष्ठभागावरील मातीचं परिक्षण केलं. इस्रोने ट्विटरवर याची माहिती दिली आहे. या माहितीनुसार चंद्रावरील तापमान कधी उणे १० अंश सेल्सिअस तर कधी ७० अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं आहे. इस्रोने सांगितलं की, यामध्ये तापमान मोजण्यासाठी १० सेन्सर्स लावण्यात आले आहेत.

How to Hide Instagram likes
झाकली मूठ..! फॉलोअर्सपासून इन्स्टाग्राम पोस्टच्या लाइक कशा लपवायच्या?
22nd October Rashi Bhavishya In Marathi
२२ ऑक्टोबर पंचांग: जन्मराशीनुसार आज कर्तुत्वाला मिळेल चांगला…
Watch Paraglider captures dog chasing birds on top of the Great Pyramid of Giza
“हे कसं शक्य आहे?”, गिझाच्या ग्रेट पिरॅमिडच्या शिखरावर पोहचला श्वान, पण कसा? पॅराग्लायडरने शेअर केलेला Video Viral
All Women Service Centre by Schwing Stetter
Schwing Stetter : आता सिमेंट मिक्सरची पिवळी यंत्रे महिला दुरुस्त करणार; वाचा कोणत्या कंपनीने घेतला निर्णय, नेमका प्रयोग काय?
YouTube Shorts to allow 3 minute videos
आता वेगाने व्हायरल होणार तुमची रील! ६० सेकंद नव्हे, बनवा ३ मिनिटांचे YouTube Shorts; समजून घ्या, नवीन अपडेटमध्ये होणार ‘हे’ तीन बदल
loksatta kutuhal artificial intelligence technology recognizing human handwriting
कुतूहल : हस्ताक्षर ओळखणारे तंत्रज्ञान
sunita william rescue nasa plan
सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतणार, ‘स्पेसएक्स’च्या क्रू-९ चे यशस्वी प्रक्षेपण; मोहिमेला विलंब का झाला? याचा नक्की परिणाम काय?
Xiaomi Diwali With Mi Offers
Xiaomi Diwali With Mi : रेडमीच्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळणार सहा हजारांची सूट; सेलच्या ऑफर्स, डिस्काउंटची ‘ही’ यादी पाहाच

दरम्यान, सोमवारी (२८ ऑगस्ट) इस्रोने प्रज्ञान रोव्हरचे काही फोटो शेअर केले. प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर फिरत असताना रोव्हरच्या वाटेत एक मोठा खड्डा (Crater) आला होता. सुदैवाने प्रज्ञान रोव्हरने खड्ड्यामुळे आपला मार्ग बदलला आणि रोव्हर सुरक्षितपणे त्याच्या बेसवर परतला आहे.

हे ही वाचा >> Aditya L1 : सूर्याच्या किती जवळ जाणार ‘इस्रो’चं अवकाशयान? सौरमोहिमेद्वारे भारत कोणतं संशोधन करणार?

इस्रोने या खड्ड्याचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. इस्रोने म्हटलं आहे की, चांद्रयान ३ मोहिमेतील प्रज्ञान रोव्हर २७ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर फिरत असताना रोव्हर एका मोठ्या खड्ड्याजवळ पोहोचला. त्यानंतर रोव्हरला मागे वळण्याची सूचना (कमांड) देण्यात आली. त्यानंतर रोव्हर सुरक्षितपणे माघारी परतला आहे. प्रज्ञान रोव्हरच्या चाकांचे ठसे चंद्राच्या पृष्ठभागावर उमटले आहेत. या ठशांचा एक फोटो इस्रोने ट्विटरवर शेअर केला आहे.