१४ जुलै रोजी पृथ्वीवरून झेपावलेल्या चांद्रयान-३ च्या ‘विक्रम’ लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद अवतरण केलं आणि भारताने नवा इतिहास घडवला. भारतीय अंतराळ संस्थेने ( इस्रो ) जाहीर केलेल्या वेळेनुसार बुधवारी ( २३ ऑगस्ट ) सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांनी चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं. याचा व्हिडीओ आता इस्रोनं ट्वीट केला आहे.

१४ जुलै रोजी ‘मार्क-थ्री’ या प्रक्षेपणयानाच्या मदतीने पाठवण्यात आलेल्या चांद्रयानाने ४१ दिवसांच्या प्रवासात एकदाही निर्धारित मार्गावरून न ढळता, एकही टप्पा न चुकवता चंद्राला गाठले होते. तीच अचूकता बुधवारी चंद्राच्या पृष्ठभागावार उतरताना दिसून आली.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Sanjay Raut Brother Post News
Sanjay Raut Brother : संजय राऊत यांच्या सख्ख्या भावाची पोस्ट चर्चेत; डिलिट करत म्हणाले, “मी..”
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
News About Marathi Drama Urmilyan
‘उर्मिलायन’ महाकाव्यातून उलगडणार रामायणातील लक्ष्मणच्या पत्नीचं कथाख्यान, ‘या’ दिवशी होणार शुभारंभाचा प्रयोग
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”

हेही वाचा : Chandrayaan-3 : अंतराळ केंद्राच्या निर्मितीसाठी इस्त्रोने श्रीहरीकोटाचीच निवड का केली? जाणून घ्या कारण…

इस्रोने केलेल्या ट्वीटवर लिहिलं की, “चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताना लँडरच्या कॅमेराने दृष्य टिपलं आहे.”

दरम्यान, अमेरिका, चीन, रशिया या बलाढ्य देशांच्या कोट्यवधी डॉलर रुपयांच्या अनेक मोहिमांमधून जे साध्य झालं नव्हतं, ते अवघ्या सहाशे कोटी रूपयांत ‘इस्त्रो’च्या शास्त्रज्ञांनी साध्य करून दाखवलं.

हेही वाचा : चांद्रयान-३ च्या लँडरचे विलगीकरण यशस्वी; आता पुढे काय?

पुढं काय?

‘विक्रम’च्या यशस्वी अवतरणानंतर आता त्यामध्ये बसविलेला २६ किलो वजताना ‘प्रज्ञान’ हा रोव्हर चंद्रपृष्ठावर उतरेल. या स्वयंचलित रोव्हरमध्ये कॅमेऱ्यासह अन्य उपकरणे आहेत. त्याच्या मदतीने मदतीने चंद्रपृष्ठावरील माती, वातावरण आदीचा अभ्यास केला जाईल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर असलेले पाणी, अन्य महत्वाची खनिजे यांची माहितीही ‘प्रज्ञान’च्या माध्यमातून गोळा केली जाईल.

Story img Loader