Chandrayaan 3 Moon Mission Launch, 14 July 2023: चांद्रयान २ मोहिमेच्या अपयशामुळे भावुक झालेले इस्रोचे वैज्ञानिक कोण विसरू शकेल? पण आता त्या अपयशाच्या स्मृती विसरून नव्याने चंद्रावर स्वारी करण्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्था आणि चांद्रयान ३ पुन्हा सज्ज झालं. आज चांद्रयान ३ श्रीहरीकोटा येथील तळावरून अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्ट रोजी ते चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे.

इथे पाहा चांद्रयान ३ मोहिमेचं यशस्वी प्रक्षेपण…

Live Updates

ISRO Moon Mission Launch: अखेर चांद्रयान ३ अवकाशात झेपावले!

15:20 (IST) 14 Jul 2023
Chandrayan 3 Launch: इस्रोच्या वैज्ञानिकांना आनंद अनावर; बोलायला शब्दही सुचेनात!

इस्रोच्या वैज्ञानिकांना चांद्रयान ३ च्या यशस्वी प्रक्षेपणाचा आनंद अनावर; बोलायला शब्दही सुचेनात! देवेंद्र फडणवीसांनी शेअर केला व्हिडीओ!

15:16 (IST) 14 Jul 2023
Chandrayan 3 Launch: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं अभिनंदन!

चांद्रयान-३ मोहिम भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक झेप ठरेल,’असा विश्वास व्यक्त करून चांद्रयान-३ च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वैज्ञानिक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. चांद्रयान-३ ही मोहिम भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील जिद्द आणि चिकाटीचे प्रतिक आहे. आपल्या वैज्ञानिकांनी या क्षेत्रात देखील ारत अग्रेसर असल्याचे सिद्ध केले आहे. चांद्रयान-३ मोहिम भारतच नव्हे, तर जगासाठी महत्वपूर्ण अशी आहे. यातून पुढे अनेक वैज्ञानिक, संशोधन प्रकल्पांना चालना मिळेल, असा विश्वास आहे. या मोहिमेसाठी भारत सरकारने आपल्या वैज्ञानिकांना सातत्यपूर्ण असे पाठबळ आणि प्रोत्साहन दिले आहे. आपल्या तरूण वैज्ञानिकांसाठी हा क्षण प्रेरणादायी आहे. भारतीयांच्या अवकाशातील या कामगिरीची जगाच्या इतिहासात गौरवाने नोंद होईल, हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे,असेही यावेळी नमूद केले.

15:15 (IST) 14 Jul 2023
Chandrayan 3 Launch: देवेंद्र फडणवीसांनी केलं अभिनंदन!

देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन करणारं ट्वीट!

15:12 (IST) 14 Jul 2023
Chandrayan 3 Launch: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदनपर ट्वीट!

चांद्रयान ३ नं भारताच्या अवकाश कार्यक्षेत्रात एक नवा अध्याय लिहिला आहे. प्रत्येक भारतीयाची स्वप्नं पूर्ण करणारी ही कामगिरी आहे. ही कामगिरी म्हणजे आपल्या वैज्ञानिकांच्या निष्ठेचीच साक्ष आहे – नरेंद्र मोदी</p>

15:09 (IST) 14 Jul 2023
Chandrayan 3 Launch: देवेंद्र फडणवीसांचं ट्वीट!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं इस्रोचं अभिनंदन!

15:09 (IST) 14 Jul 2023
Chandrayan 3 Launch: चौथी अंतरिक्ष महाशक्ति बनने की ओर अपना भारत – शिवराज सिंह चौहान

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं अभिनंदनपर ट्वीट!

15:07 (IST) 14 Jul 2023
Chandrayan 3 Launch:

इस्रो संचालक व प्रकल्प संचालकांनी व्यक्त केल्या भावना!

15:06 (IST) 14 Jul 2023
Chandrayan 3 Launch: अमोल कोल्हेंचं ट्वीट!

अमोल कोल्हेंनी केलं इस्रोचं अभिनंदन करणारं ट्वीट!

15:06 (IST) 14 Jul 2023
Chandrayan 3 Launch: रोहित पवारांनी केलं अभिनंदनाचं ट्वीट

इस्त्रोतील सर्व शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांच्या मेहनतीला अखेर यश – रोहित पवार

15:05 (IST) 14 Jul 2023
Chandrayan 3 Launch: अभिमानास्पद क्षण – मनसे

चांद्रयान ३ च्या प्रक्षेपणानंतर मनसेचं शुभेच्छा देणारं ट्वीट!

15:04 (IST) 14 Jul 2023
Chandrayan 3 Launch: इस्रोच्या वैज्ञानिकांचा जल्लोष!

चांद्रयान ३ पृथ्वीच्या भ्रमणकक्षेत प्रविष्ट झाल्यानंतर इस्रोच्या वैज्ञानिकांनी असा जल्लोष केला!

14:59 (IST) 14 Jul 2023
Chandrayan 3 Launch: असं झालं चांद्रयान ३ चं यशस्वी प्रक्षेपण, पाहा व्हिडीओ!

असं झालं चांद्रयान ३ चं यशस्वी प्रक्षेपण, पाहा व्हिडीओ!

14:55 (IST) 14 Jul 2023
Chandrayan 3 Launch: पृथ्वीभोवतीच्या कक्षेत चांद्रयान ३ पोहचले!

इस्रोच्या प्रक्षेपकाने, रॉकेटने – LMV 3 ने कामगिरी चोख बजावली, पृथ्वीभोवतीच्या कक्षेत चांद्रयान ३ पोहचले!

14:55 (IST) 14 Jul 2023
Chandrayan 3 Launch:

चांद्रयान ३ नं चंद्राच्या दिशेने त्याचा प्रवास सुरू केला आहे. त्याच्या पुढच्या प्रवासासाठी मी चांद्रयान ३ ला शुभेच्छा देतो.

एस. सोमनाथ, इस्रोचे संचालक

14:54 (IST) 14 Jul 2023
Chandrayan 3 Launch: चांद्रयान ३ नियोजित कक्षेत पोहचले…

चांद्रयान ३ नियोजित कक्षेत पोहचले…

14:51 (IST) 14 Jul 2023
Chandrayan 3 Launch: चांद्रयान ३ चंद्राच्या कक्षेत कधी जाणार?

५ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्राच्या भ्रमणकक्षेत दाखल होईल…

14:44 (IST) 14 Jul 2023
Chandrayan 3 Launch: चांद्रयान ३ पृथ्वीच्या भ्रमणकक्षेत प्रवेश करण्यास सज्ज

काही क्षणांत चांद्रयान ३ पृथ्वीच्या भ्रमण कक्षेत प्रवेश करेल…

14:42 (IST) 14 Jul 2023
Chandrayan 3 Launch: चांद्रयान ३ नं दुसरा टप्पा पार केला!

चांद्रयान ३ नं दुसरा टप्पा यशस्वीरीत्या पार केला असून आता तिसऱ्या टप्प्यात यानानं प्रवेश केला आहे.

14:41 (IST) 14 Jul 2023
Chandrayan 3 Launch: चांद्रयान ३ नं पहिला टप्पा केला पार

प्रक्षेपणाचा पहिला टप्पा चांद्रयान ३ नं यशस्वीरीत्या पार केला आहे.

14:39 (IST) 14 Jul 2023
Chandrayan 3 Launch: चांद्रयान ३ चे पेलोड वेगळे झाले

चांद्रयान ३ चे पेलोड वेगळे झाले…

14:37 (IST) 14 Jul 2023
Chandrayan 3 Launch: अखेर चांद्रान ३ अवकाशात झेपावले!

गेल्या चार वर्षांच्या मेहनतीनंतर अखेर चांद्रयान ३ अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्ट रोजी ते चंद्रावर उतरण्याचं नियोजन इस्रोच्या वैज्ञानिकांनी केलं आहे.

14:25 (IST) 14 Jul 2023
Chandrayan 3 Launch: पुढच्या १० मिनिटांत प्रक्षेपण होणार

२ वाजून ३५ मिनिटांनी चांद्रयान ३ चं प्रक्षेपण केलं जाईल.

14:18 (IST) 14 Jul 2023
Chandrayan 3 Launch: मिशन डायरेक्टरनं ऑटोमॅटिक लाँचला दिला हिरवा कंदील!

मिशन डायरेक्टरनं ऑटोमॅटिक लाँचला दिला हिरवा कंदील!

14:17 (IST) 14 Jul 2023
Chandrayan 3 Launch: पाहा चांद्रयान ३ मोहिमेचं थेट प्रक्षेपण लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलवर!

पाहा चांद्रयान ३ मोहिमेचं थेट प्रक्षेपण लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलवर!

14:15 (IST) 14 Jul 2023
Chandrayan 3 Launch: चांद्रयान ३ मोहिमेसाठी निसर्गानं दिला ‘गो अहेड’!

चांद्रयान ३ च्या प्रक्षेपणासाठी हवामान अनुकूल, प्रक्षेपणाचा मार्ग मोकळा, पावसाची शक्यता नाही, लख्ख सूर्यप्रकाश

13:00 (IST) 14 Jul 2023
Chandrayan 3 Launch: चांद्रयान ३ मोहीम भारतासाठी गेम चेंजर ठरणार – नम्बी नारायणन

चांद्रयान ३ मोहीम भारतासाठी गेम चेंजर ठरणार – इस्रोचे माजी वैज्ञानिक नम्बी नारायणन यांचा विश्वास

12:57 (IST) 14 Jul 2023
Chandrayan 3 Launch: चांद्रयान ३ मोहिमेला अनोख्या शुभेच्छा, पाहा व्हिडीओ!

सँट आर्टिस्ट सुदर्शन पटनाईक यांच्या चांद्रयान मोहिमेला अनोख्या शुभेच्छा, ५०० स्टीलच्या वाट्यांच्या मदतीने तयार केली चांद्रयान ३ ची प्रतिकृती!

12:51 (IST) 14 Jul 2023
Chandrayan 3 Launch: पूरा होगा ख्वाब, हम होंगे कामयाब – अशोक गेहलोत

पूरा होगा ख्वाब, हम होंगे कामयाब… राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास!

12:41 (IST) 14 Jul 2023
Chandrayan 3 Launch: २० वर्षांतील चांद्रमोहिमेचे यश

तिरुवनंतपूरम येथील विक्रम साराभाई अंतराळ केंद्र येथे पीएसएलव्ही-सी ११ तयार करण्यात आले होते.

वाचा सविस्तर

12:25 (IST) 14 Jul 2023
Chandrayan 3 Launch: ISROच्या मोहिमेचा चंद्रावरील helium 3 शी संबंध काय? हे खनिज का महत्वाचे?

Chandrayaan-3 Mission Launch : चंद्रावर असलेल्या helium 3 च्या अस्तित्वामुळे चंद्र एक मोठा इंधनाचा स्त्रोत म्हणून भविष्यात ओळखला जाण्याची शक्यता आहे. यामुळेच चंद्राकडे मोहिमा आखल्या जात आहेत.

वाचा सविस्तर

चांद्रयान ३ लॉन्च

ISRO Moon Mission Launch: थोड्याच वेळात चांद्रयान ३ अवकाशात झेपावणार!