भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ‘इस्रो’ने गेल्या आठवड्यात एक महत्त्वकांक्षी मोहीम फत्ते केली. भारताचं चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवून इतिहास रचला. १४ जुलै रोजी चांद्रयान-३ चं प्रक्षेपण झालं होतं. ४० दिवसांचा प्रवास करून चांद्रयान-३ चं ‘विक्रम’ लँडर अलगदपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं. यानंतर ‘विक्रम’ लँडरमधून ‘प्रज्ञान’ रोव्हर बाहेर पडला आणि त्याने तिथे संशोधनाला सुरूवात केली आहे. चांद्रयान ३ चंद्रावर उतरल्यापासून विक्रम लँडरच्या माध्यमातून चंद्रावरील वेगवेगळी माहिती आपल्यासमोर येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चांद्रयान इस्रोच्या मुख्यालयाला कधी चंद्राच्या पृष्ठभागाचे, तिथल्या खंदकांचे तर कधी मातीचे फोटो पाठवत असतं. तर कधी तिथल्या तापमानाची माहिती देत असतं. दरम्यान, आता प्रज्ञान रोव्हरने चंद्रावर उतरलेल्या विक्रम लँडरचा फोटो पाठवला आहे. हे फोटो इस्रोने ट्विटरवर शेअर केले आहेत. याचबरोबर एक मजेदार कॅप्शनही दिलं आहे.

इस्रोने म्हटलं आहे की प्रज्ञान रोव्हरने आज सकाळी विक्रम लँडरचे फोटो काढले. प्रज्ञान रोव्हरवर बसवण्यात आलेल्या रोव्हर नेव्हिगेशन (NavCam) कॅमेऱ्याच्या सहाय्याने हे फोटो काढले आहेत. लॅबोरेटरी फॉर इलेक्ट्रो-ऑप्टिक्सने (LEOS) हा कॅमेरा खास चांद्रयान-३ मिशनसाठी विकसित केला आहे. इस्रोने या फोटोला ‘स्माईल प्लीज’ असं कॅप्शनही दिलं आहे.

हे ही वाचा >> “मी त्यांना अटकेपासून वाचवलं”, छगन भुजबळांच्या आरोपांवर शरद पवारांचं उत्तर

‘प्रज्ञान’ला चंद्रावर आढळलं ऑक्सिजन

दरम्यान, चांद्रयान-३ मोहिमेत इस्रोला मोठं यश मिळालं आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागावर ऑक्सिजनसह काही मुलद्रव्ये आढळली आहेत. ‘प्रज्ञान’ रोव्हवरील लेझर-प्रेरित ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोपी (एलआयबीएस) उपकरणाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागावर इन-सीटू मोजमाप केलं. तेव्हा हा शोध लागला आहे. ‘प्रज्ञान’ रोव्हरला संशोधनावेळी चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर (एस) असल्याचं आढळलं आहे. तर, हायड्रोजनचा (एच) शोध घेतला जात असल्याचं ‘इस्रो’नं सांगितलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrayaan 3 mission pragyan rover clicked photo of vikram lander on moon asc
Show comments