चांद्रयान ३ च्या विक्रम लँडरमध्ये एक असं टेक्निक इनबिल्ट केलं आहे जे सॉफ्ट लँडिंगमध्ये त्याची मदत करेल. काहीही गडबड झाली तरीही या तंत्रामुळे व्यवस्थित लँडिंग होईल अशी माहिती एअरोस्पेस वैज्ञानिकाने दिली. चांद्रयान २ हे जेव्हा अपयशी झालं त्या अपयशातून आम्ही खूप काही शिकलो आहोत. त्यामुळे आम्हाला इतका आत्मविश्वास आहे की विक्रम लँडरचं लँडिंग अगदी व्यवस्थित होईल.
बंगळुरु या ठिकाणी असलेल्या भारतीय विज्ञान संस्थेचे एयरोस्पेस वैज्ञानिक प्रा. राधाकांत पाधी यांनी चांद्रयान दोन विषयीही महत्त्वाची माहिती दिली. राधाकांत असं म्हणाले की चांद्रयान २ ही मोहीम अपयशी ठरली कारण त्यावेळी विक्रम लँडर आपला वेग नियंत्रित करु शकलं नव्हतं त्यामुळे ते कोसळलं. हे अपयश अल्गोरिदमचं होतं. मात्र आम्ही त्यातून शिकलो आहोत आणि यात आता अनेक महत्त्वाच्या सुधारणा केल्या आहेत. विक्रम लँडर आता आणखी बळकट करण्यात आलं आहे. एनडीटीव्हीशी चर्चा करताना राधाकांत पाधी यांनी ही माहिती दिली.
हे पण वाचा- ‘Welcome Buddy!’ चांद्रयान-२ च्या ऑर्बिटरने केलं चांद्रयान-३ च्या लँडरचं स्वागत
प्राध्यापक राधाकांत पाधी चांद्रयान २ आणि ३ या दोन्हीच्या लाँचिंगमध्ये सहभागी होते. भारतीय विज्ञान संस्थेच्या एअरोस्पेस विभागातही त्यांचं मोठं योगदान आहे. भारतीय अंतराळ संस्था ISRO चे वैज्ञानिक चांद्रयान २ च्याबाबतीत अति आत्मविश्वासात होते. असंही वक्तव्य पाधी यांनी केलं आहे. राधाकृष्ण पाधी यांनी असं म्हटलं आहे की यावेळी लँडिंग यशस्वी होईल. चांद्रयान ३ ला सहा सिग्मा बाउंड साठी डिझाईन तयार करण्यात आलं आहे. त्यामुळे विक्रम लँडर जास्त बळकट आहे. तसंच चांद्रयान ३ ची स्ट्रेस चाचणीही करण्यात आली आहे. या मोहिमेच्या वेळी ISRO ने विशेष काळजी घेतली आहे.
हे पण वाचा Moon Landing :रशिया अपयशी, आता भारत प्रयत्न करणार; पण चंद्रावर अलगद उतरणारे पाहिले यान कोणते, कोणत्या देशाचे होते?
चांद्रयान ३ च्या विक्रम लँडरमध्ये दोन ऑन बोर्ड कम्प्युटर आहेत. चांद्रयान २ मध्ये एक होते. मला ९९.९ टक्के विश्वास आहे की यावेळची मोहीम यशस्वी होईल. चांद्रयान ३ च्या लँडरद्वारे जी नवी छायाचित्रं घेण्यात आली आहेत त्यानुसार चंद्रावरच्या प्रमुख खड्ड्यांची ओळख जगाला झाली आहे. लँडर बुधवारी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड करणार आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर भारत या ठिकाणी लँडर नेणारा चौथा देश ठरणार आहे. याआधी अमेरिका, रशिया आणि चीन यांचे लँडर हे त्या ठिकाणी आहेत.