प्रसिध्‍द फॅशन डिझायनर कार्ल लगारफेल्‍ड यांचे वयाच्‍या ८५ व्‍या वर्षी निधन झाले. कार्ल लगारफेल्‍ड हे शनेल या कंपनीचे क्रिएटिव्‍ह डायरेक्‍टर होते. कार्ल लगारफेल्‍डच्या जाण्याने फॅशन जगतात दुखाचे वातावरण आहे. कार्ल लगारफेल्‍ड यांच्या जाण्याने त्यांची पाळीव मांजर शूपेत चांगलेच प्रसिद्धीत आहे. कारण, असे वृत्त आहे की, कार्ल लगारफेल्‍ड यांच्या सर्व संपत्तीची मालकीण त्यांची पाळीव मांजर होणार आहे. कार्ल लगारफेल्‍ड यांची शूपेत मांजर १४ हजार कोटींची संपत्तीची मालकीण  होणार आहे. असे झाल्यास ही जगातील सर्वात श्रीमंत मांजर असेल.

कार्ल लगारफेल्‍ड पाळीव मांजर शूपेतवर खूप प्रेम करत होते. शूपेत स्वत: एक फॅशेन आयकॉन आहे. तिच्या नावाने इन्स्टाग्रामवर पेजही आहे. त्या पेजचे लाखो फॉलोअर्सही आहेत. या पेजला डिजिटल मार्केटिंगची तज्ज्ञ ऐशली सांभाळत आहे. शेपूतवर एक पूस्तकही बाजारात उपलब्ध आहे. त्या पुस्तकाचे नाव ‘ Choupette- The Private Life of a High-Flying Fashion Cat’ असे आहे.

लगारफेल्‍ड यांनी आपल्या मांजरीच्या देखरेखीसाठी दोन नोकर आणि एक सुरक्षारक्षक नेमले होते. लगारफेल्‍ड यांचे शेपूतवर ऐवढे प्रेम होते की, जर प्राण्याशी लग्न करण्याची परवानगी असती तर त्यांनी लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. शेपूत आणि लगारफेल्‍ड यांच्यात घनिष्ट नाते होते. लगारफेल्‍ड यांच्यामते दोघांमध्ये नजरेच्या माध्यामातून संवाद होत होता. डोळ्यांमधून दोघे एकमेंकांच्या भावना ओळखत असे. रिपोर्टसनुसार, शेपूत यांची काळजी आणि सांभाळ ब्रॅड आणि हडसन ठेवणार आहे. ब्रॅड एक मॉडेल आहे. लगारफेल्‍ड यांना ते आपला गॉडफादर मानत आहे.

डिझायनर कार्ल लागरफेल्ड यांना पॅरिसमध्‍ये खरेदी करायला आवडायचे. त्‍यांनी या छंदापोटी फ्रान्‍सच्‍या राजधानीत विशेष करून कपड्‍यांच्‍या प्रसिध्‍द दुकानांमध्‍ये खरेदी करण्‍यासाठी बराच वेळ घालवायचे. कार्ल म्‍हणायचे की, पॅरिसच्‍या रस्‍त्‍यांवर मी निवांतपणे फिरू शकतो. कुणाला पॅरिस आवडणार नाही? आपण याची तुलना अन्य शहरांशी करू शकत नाही, अशी माहिती एका वेबसाईटने दिली होती. कार्ल लागरफेल्ड यांनी आपल्‍या फॅशनचे सादरीकरण करण्‍यासाठी अनेक शोज आयोजित केले होते. आपल्‍या शोच्‍या फॅशनसाठी जगभरातील प्रसिध्‍द, दिग्‍गज मंडळींना आमंत्रित करायचे.

Story img Loader