UK General Election 2024 Result : ब्रिटनमध्ये सत्तांतर घडून आले असून भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीचा पराभव स्वीकारताना ऋषी सुनक यांनी जनादेशाचे वर्णन “विचारपूर्वक निर्णय” असे केले आहे. त्यांनी आत्मनिरीक्षण आणि परिणामांमधून शिकण्याच्या महत्त्वावर भर दिला. “आज, सत्ता सुरळीतपणे आणि शांततेने बदलेल, ज्यामध्ये सर्व पक्षांच्या सदिच्छा सहभागी आहेत”, असं सुनक म्हणाले. “मी नुकसानीची संपूर्ण जबाबदारी घेतो आणि ब्रिटीश लोकांनी दिलेला महत्त्वपूर्ण संदेश समजतो. आत्मसात करण्यासारखे आणि विचार करण्यासारखे बरेच काही आहे”, असंही ते पुढे म्हणाले.

सकाळी १० वाजेपर्यंत किर स्टार्मर यांच्या मजूर पक्षाने ३८१ जागा जिंकल्या आहेत, तर पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाला फक्त ९२ जागा मिळाल्या आहेत. एकूण ६५० जागांपैकी ५१५ जागांचा निकाल हाती आला आहे. त्यामुळे २०२४ च्या या सार्वत्रिक निवडणुकीत मजूर पक्षाचा विजय निश्चित मानला जातोय.

one nation one election
मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाची ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक
Sharad Pawar asserts that distrust in the electoral system should be removed print politics news
मारकडवाडीवरून कलगीतुरा, निवडणूक यंत्रणेबद्दल अविश्वास दूर करा; शरद पवारांचे मारकरवाडीत प्रतिपादन
Amol Khatal
Amol Khatal : बाळासाहेब थोरातांना पराभूत करणारा आमदार खास टोपी घालून विधान भवनात; म्हणाले, “ही टोपी…”
Waqf Amendment Bill to be tabled in February 2025 budget session
‘वक्फ’मध्ये महत्त्वाचे बदल नाहीच? मूळ विधेयक लोकसभेत संमत होण्याची शक्यता
bjp released oath taking ceremony date and invitation card
सरकार स्थापनेच्या दाव्यापूर्वीच शपथविधीची तारीख आणि निमंत्रणपत्रिकाही
'आप' पक्षाने काँग्रेसबरोबर युती करण्यास का दिला नकार? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Elections 2025 : आम आदमी पक्षाने काँग्रेसबरोबर युती करण्यास का दिला नकार? काय आहेत कारणे?

गेल्या १४ वर्षांपासून सत्तेत असलेला हुजूर पक्ष आणि प्रमुख विरोधी मजूर पक्ष हे दोन मोठे पक्ष ब्रिटनमध्ये आहेत. तेथील सत्ता ही या दोन पक्षांपैकी एकाकडे असते. त्यातही हुजूर पक्षाला सत्तेत राहण्याची सर्वाधिक संधी ब्रिटनच्या जनतेने दिली आहे. सध्या हुजूर पक्षाचे नेतृत्व सुनक यांच्याकडे, तर मजूर पक्षाची धुरा एप्रिल २०२० पासून स्टार्मर यांच्याकडे आहे.  तर, स्टार्मर यांनी या निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवलं असून सुनक यांच्या पक्षाला अवघ्या ८० जागांवर समाधान मानावं लागलं आहे.

लंडनमधील विजयी रॅलीला संबोधित करताना, स्टार्मर म्हणाले, “आता बदल सुरू होतो आहे. अशा आदेशामुळे मोठी जबाबदारी येते”.

एक्झिट पोलच्या अंदाजानुसार,कंझर्व्हेटिव्ह पक्षाला केवळ १३१ जागा मिळण्याचा अंदाज आहे. २०१९ च्या निवडणुकीत त्यांच्या ३६५ जागा होता. परंतु आता मोठी घट झाली आहे.

बातमी अपडेट होत आहे.

Story img Loader