मणिपूर विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान होणार असून मतदानाचे दिवस बदलण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने गुरुवारी सांगितले. मतदान २७ फेब्रुवारी आणि ३ मार्च रोजी घेण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. मात्र आता त्यात बदल करून २८ फेब्रुवारी आणि ५ मार्च रोजी मतदान घेण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यातील सध्याची परिस्थती, मतदानाची तयारी, रसद आदी मुद्दे लक्षात घेऊन मतदानाच्या दिवसांत बदल करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वी पंजाबमध्येही मतदानाचा दिवस बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राज्य सरकार आणि विवध राजकीय पक्षांच्या मागणीनंतर पंजाबमध्ये १४ फेब्रुवारीऐवजी २० फेब्रुवारीला मतदान होणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Changes in the voting schedule in manipur akp