नवी दिल्ली : ‘वक्फ’ विधेयकासंबंधी नेमण्यात आलेल्या संसदीय समितीच्या बैठकीत मंगळवारी प्रचंड गोंधळ झाला. वादावादीनंतर तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी काचेची बाटली फोडून अध्यक्षांच्या दिशेने भिरकावली. यामध्ये स्वत: बॅनर्जीच जखमी झाले, तर असभ्य वर्तनासाठी त्यांचे एक दिवसासाठी निलंबन करण्यात आल्याचीही माहिती आहे. वक्फ (सुधारणा) विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीला वेगळे वळण लागले. बैठकीत भाजपचे अभिजीत गंगोपाध्याय आणि बॅनर्जी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> Air Quality Index 2024: भारतातली १० सर्वोत्कृष्ट व १० सर्वात वाईट शहरे कोणती?

वादानंतर बॅनर्जी यांनी पाण्याने भरलेली काचेची बाटली फोडली आणि ती समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांच्या दिशेने भिरकावली. यात बॅनर्जी यांच्या हाताचा अंगठा आणि करंगळीला दुखापत झाली. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी आणि आपच्या संजय सिंह यांनी बॅनर्जी यांना तिथून बाहेर नेले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असभ्य वर्तन करणे, अपशब्द वापरणे, काचेची बाटली अध्यक्षांच्या दिशेने भिरकाविणे या कारणांसाठी बॅनर्जींचे एक दिवसासाठी निलंबन करण्याचा प्रस्ताव ९ विरुद्ध ८ मतांनी मंजूर करण्यात आला. या घटनेवर बॅनर्जी यांनी बोलण्यास नकार दिला आहे.