बनावट पासपोर्ट प्रकरणी विशेष न्यायालयाने बुधवारी कुख्यात गँगस्टर छोटा राजन आणि अन्य तिघांविरोधात फसवणूक, खोटी सही करणे आणि गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणे आदी आरोप ठेवले.
छोटा राजन याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले तेव्हा विशेष सीबीआय न्यायाधीश विनोदकुमार यांनी वरील आदेश दिला. तीन सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने छोटा राजन याने मोहनकुमार या नावाने पासपोर्ट मिळविल्याबद्दल राजन याच्याविरुद्ध आरोप ठेवण्यात आले आहेत. सदर तीन सरकारी अधिकारीही या प्रकरणातील आरोपी आहेत.
या प्रकरणाची सुनावणी ११ जुलैपासून दररोज होणार आहे, राजन हा अनेक दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहे त्यामुळे सुनावणी दररोज घेण्यात यावी, असे न्यायाधीशांनी म्हटले आहे.
राजन याच्यासमवेत तीन माजी सरकारी अधिकारी जयश्री दत्तात्रेय रहाटे, दीपक नटवरलाल शहा आणि ललिता लक्ष्मणन यांच्याविरोधातही सुनावणी होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वयेही आरोप ठेवण्यात आले आहेत.
सुनावणी सुरू असताना राजन याच्या वतीने त्याची नमुना स्वाक्षरी घेण्याबाबतचा अर्ज करण्यात आला त्याला न्यायालयाने मान्यता दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा