पॅरिसमधील ‘शार्ली एब्दो’ या व्यंग्यचित्रसाप्ताहिकाच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या तीन संशयितांपैकी एकाने पोलिसांसमोर गुरूवारी शरणागती पत्कारली. शरणागती पत्कारणारा हैमद मोराद अवघ्या १८ वर्षांचा असल्याचे समजत आहे. त्यामुळे पोलिस आता मोठा शस्त्रसाठा बाळगून असणाऱ्या उर्वरित दोघांचा शोध घेत आहेत. हे सर्वजण अल-कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पॅरिसमधील ‘शार्ली एब्दो’ या व्यंग्यचित्रसाप्ताहिकाच्या कार्यालयात बुधवारी तीन अतिरेक्यांनी चढविलेल्या हल्ल्यात या साप्ताहिकातील १२ पत्रकार आणि कर्मचारी ठार झाले होते. या हल्ल्यात दोन पोलीसही मृत्युमुखी पडले असून सहाजण गंभीर जखमी झाले होते. फ्रान्समधील हा चार दशकांतील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असून त्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही अतिरेकी संघटनेने स्वीकारलेली नाही.

पत्रकारितेवर दहशतवादी हल्ला

Story img Loader