निर्घृण दहशतवादी हल्ल्यानंतरही ‘शार्ली एब्दो’ सुरूच राहणार असल्याचा ठाम निश्चय व्यंगचित्र साप्ताहिकाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. पुढील आठवडय़ात ‘शार्ली एब्दो’चा अंक बाजारात येईलच, असे कर्मचाऱ्यांतर्फे गुरुवारी सांगण्यात आले. ‘आमच्या सहकाऱ्यांची निर्घृण हत्या झाली असली तरी आम्ही मूर्खपणाला जिंकू देणार नाही. आम्ही सध्या प्रचंड मानसिक धक्क्यातून जात आहोत. आमचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. तरीही आम्ही न हरता पुन्हा नव्याने सुरुवात करू. उर्वरित कर्मचारी ही जबाबदारी पार पाडतील आणि तीच खरी आमच्या सहकाऱ्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,’ असे सांगत पॅट्रिक पेलॉ या स्तंभलेखकाने व्यंगचित्र साप्ताहिक यापुढेही सुरूच राहील, याची ग्वाही दिली.  

Story img Loader