Check Your Oranges ad: भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग यांच्या ‘यू वी कॅन’ या एनजीओजने स्तनांच्या कर्करोगाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी दिल्ली मेट्रोमध्ये एक जाहिरात प्रतर्शित केली होती. मात्र या जाहिरातीमध्ये महिलांच्या स्तनांसाठी संत्री हा शब्द वापरल्यामुळे सध्या या जाहिरातीवर चौफेर टिका होत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी या जाहिरातीबाबत आक्षेप घेतल्यानंतर दिल्ली मेट्रो प्रशासनाने ही जाहिरात हटविण्याचा निर्णय घेतला आहे.

दिल्ली मेट्रोमध्ये लावलेल्या जाहिराताचा फोटो काढून काही प्रवाशांनी ते सोशल मीडियावर पोस्ट केले होते आणि त्यावर आक्षेप घेतला होता. अनेकांनी ही जाहिरात लाजिरवाणी आणि भयंकर असल्याचे म्हटले आहे. वाद उद्भवल्यानंतर दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने दि. २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सदर वादग्रस्त जाहिरात हटविली. ही जाहिरात फक्त एकाच ट्रेनमध्ये लावली होती, अशीही स्पष्टोक्ती रेल्वेतर्फे देण्यात आली.

Video Story Of Ravindra Dhangekar And Devendra Fadnavis.
Ravindra Dhangekar: “निवडणूक हरत असल्याचे लक्षात येताच…” फडणवीसांच्या ‘ॲक्सिडेंटल आमदार’ टीकेला धंगेकरांचे प्रत्युत्तर; पाहा व्हिडिओ
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Sonali Bendre was body shamed due to her long neck, people called her giraffe
“मला जिराफ म्हटलं जायचं”, सोनाली बेंद्रेवर एकेकाळी व्हायची टीका, बॉडिशेमिंगचा आरोग्यावर कसा होतो परिणाम, तज्ज्ञांनी केला खुलासा
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Ritika Sajdeh salutes Aaron Finch for defending husband Rohit Sharma after Sunil Gavaskar comment
Ritika Sajdeh : सुनील गावस्करांच्या वक्तव्यावर रोहितच्या बायकोची जबरदस्त प्रतिक्रिया, सोशल मीडियावर चाहत्यांचे वेधलं लक्ष
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
Commodification of beauty
स्त्री ‘वि’श्व : सौंदर्याचं वस्तूकरण
desi jugaad room heater made of brick
देसी जुगाड! थंडीपासून वाचण्यासाठी पठ्ठ्याने विटेपासून बनवला रुम हीटर; Video पाहून युजर्स शॉक, म्हणाले, “मृत्यूला…”

Confusedicius नावाच्या एका एक्स युजरने या जाहिरातीवर टीका करताना म्हटले की, जर स्तनांच्या कर्करोगाबाबत जागृती करत असताना आपण स्तनाचा उल्लेखच करणार नसू तर ही जागृती कशी असेल. दिल्ली मेट्रोमधील जाहिरात पाहिल्यानंतर वाटले हे काय आहे? तुमची संत्री तपासा? कुणी तयार केली अशी जाहिरात आणि त्याला संमती तरी कशी दिली? ही जाहिरात लाजिरवाणी आणि भयंकर आहे.

फैजान नावाच्या आणखी एका युजरने म्हटले की, स्तनाला आता आपण संत्री म्हणणार आहोत का? युवराज सिंगच्या एनजीओने ही जागृती केलेली आहे. स्तनाच्या कर्करोगाचे निदान होण्यासाठी महिलांना त्यांची संत्री महिन्यातून एकदा तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

डॉ. जेसन फिलिप यांनीही या जाहिरातीवर आक्षेप घेतला. एक्सवर केलेल्या पोस्टमध्येते म्हणाले, मला ही जाहिरात खटकली. माझी आई स्तनाच्या कर्करोगामुळे दगावली. चौथ्या टप्प्यावर कर्करोग असल्याचे निदान झाले होते. खेदाची बाब म्हणजे तिचा मुलगा ब्रेस्ट सर्जनआहे. तरीही तिला तिच्या दुखण्याबाबत मुलाला सांगता आले नाही. जर आजाराबाबत थोडे लवकर कळले असते तर त्यावर इलाज करता आला असता. त्यामुळे कृपया करून स्तनांच्या कर्करोगाला लैंगिकतेशी जोडू नका. हा आता जगभरात पसरलेला कर्करोग आहे.

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनीही सदर जाहिरातीनंतर नाराजी व्यक्त केली आहे.

महुआ मोईत्रा यांनी एक्सवर दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनला टॅग करून म्हटले की, ते संत्री नाहीत तर स्तन आहेत. कृपया हे स्पष्टपणे म्हणा. तुमची आई, पत्नी, बहीण आणि मुलीलाही ते आहेत. ती संत्री नाहीत.

युवराज सिंगच्या YouWeCan या एनजीओची स्थापना २०१२ साली करण्यात आली होती. कर्करोगाच्या विरोधात लढणाऱ्या लोकांना जागृती, लवकर निदान करणे, रुग्णांना सहकार्य आणि रुग्णाच्या पश्चात उरलेल्या कुटुंबियांना बळ देणे अशा प्रकारचे उपक्रम या एनजीओकडून घेतले जातात.