नवी दिल्ली : मध्य प्रदेशच्या कुनो राष्ट्रीय उद्यानाची हद्द ओलांडून एक चित्ता नुकताच भरकटला होता. या अभयारण्यात सोडलेले चित्ते त्यांचा अधिवास शोधत आहेत. त्या प्रयत्नांत तो भरटकला असावा. मात्र, हे चांगले लक्षण असल्याचा निर्वाळा पर्यावरण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी दिला.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये नामिबियातून आणलेल्या आठ चित्त्यांपैकी एक चित्ता- ओबान कुनो अभयारण्याच्या हद्दीतून २ एप्रिल रोजी भरकटला. त्याची गुरुवारी संध्याकाळी लगतच्या शिवपुरी जिल्ह्यातील वनक्षेत्रातून मुक्तता करून, त्याला पुन्हा अभयारण्यात सोडण्यात आल्याचे राज्याच्या वन अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले. अतिरिक्त वन महासंचालक व ‘प्रोजेक्ट टायगर’चे प्रमुख एस. पी. यादव यांनी सांगितले, की चित्त्यांची अशी वर्तणूक ही एक नैसर्गिक आहे. यात चिंताजनक काही नाही. चार चित्ते या अभयारण्यात संपूर्ण मुक्त सोडण्यात आले आहेत. ते जंगलात नैसर्गिक मुक्तपणे वावरत आहेत, याचा आनंद वाटत आहे. हे चित्ते येथे वावरताना आपल्या अधिवासाचा शोध घेत आहेत. असे फिरल्यानंतरच ते आपला योग्य अधिवास निवडतात. या मुक्त केलेल्या प्रत्येक चित्त्यावर आमची २४ तास बारकाईने नजर आहे.

Fossil footprints show life on earth
कुतूहल : खडकांवरच्या पाऊलखुणा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Wildlife scientists and animal researchers claim about the golden fox thane news
मानवी वस्तीत येणारे सोनेरी कोल्हे निवासीच! वन्यजीव शास्त्रज्ञ, प्राणी अभ्यासकांचा दावा
Forest Minister Ganesh Naik announced to develop tiger and leopard habitat
वन्य प्राणी अनुभव, वाघ बिबट्या सफारी, वन्यजीव पर्यटन महाराष्ट्र, प्राणी वस्ती संरक्षण, वाघ – बिबट्यांचे अधिवास क्षेत्र विकसित करणार
Tiger death , Kohka-Bhanpur route, tiger gondia ,
राज्यात वाघांच्या मृत्यूचे सत्र! कॉरिडॉरमध्ये वाघाचा मृत्यू
Video About Vadhvan Port
Vadhvan Port : वाढवण बंदर का महत्त्वाचं आहे? पाच वैशिष्ट्ये कुठली? लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचं सखोल विश्लेषण
Villagers of Kundevhal Bambawipada suffer from respiratory problems due to dust from mines
कुंडेवहाळ, बंबावीपाडा ग्रामस्थांचे आयुष्य ‘माती’मोल; खदाणींच्या धुळीमुळे श्वसनाचे विकार, प्रशासनाचे दुर्लक्ष
Loksatta explained What radio collars have revealed about tiger migration
विश्लेषण: ‘रेडिओ कॉलर’मुळे वाघांच्या स्थलांतराबाबत काय कळले?

‘चित्ता मित्रां’ची नियुक्ती

चित्ता आणि मानवातील संघर्ष टाळण्यासाठी सरकारने स्थानिकांत जागृती करण्यासाठी ‘चित्ता मित्रां’ची नियुक्ती केली आहे. ‘चित्ता मित्र’ होण्यासाठी ५१ गावांतील ४०० जणांना मध्य प्रदेशच्या वनाधिकाऱ्यांनी प्रशिक्षित केले आहे. यात शाळा शिक्षक, गावप्रमुख, तलाठय़ांचा समावेश आहे. जर मानवी वस्तीतील शेळय़ा, मेंढय़ा या चित्त्यांनी मारल्या तर संबंधित मालकांना योग्य ती नुकसानभरपाई दिली जाईल, असेही यादव यांनी सांगितले.

Story img Loader