चेन्नईतील एका कंपनीने दिवाळीपूर्वी त्यांच्या कर्मचाऱ्यांना चक्क कार आणि बाईक भेट म्हणून दिली आहे. ‘टीम डिटेलिंग सोल्युशन्स’ असं या कंपनीचे नाव आहे. ही कंपनी स्टील डिझाइन क्षेत्रात काम करते. महत्त्वाचे म्हणजे कंपनीने कर्मचाऱ्यांना भेट म्हणून दिलेल्या कारमध्ये ह्युंदाई, टाटा, मारुती, सुझुकी आणि मर्सिडीज बेंझ या कंपन्यांच्या गाड्यांचा समावेश आहे. कंपनीच्या निर्णयानंतर आता समाज माध्यमांवर याची जोरदार चर्चा सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनी कंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, या कंपनीने त्यांच्या २८ कर्मचाऱ्यांना कार, तर २९ कर्मचाऱ्यांना दुचाकी भेट म्हणून दिली आहे. यासंदर्भात बोलताना, आमचे कर्मचारी आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. हे कर्मचारीच आमची संपत्ती आहे. कंपनीच्या यशात या कर्मचाऱ्यांचे मोठं योगदान आहे. या कर्मचाऱ्यांना आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने आम्ही त्यांना भेट देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्रीधरन कन्नन यांनी दिली.

हेही वाचा – ‘भावानं जग जिंकलं…’ आईच्या खांद्यावर हात ठेवून लेकरानं बसवलं नवीन गाडीत; VIRAL VIDEO पाहून डोळ्यांत येईल पाणी

२०२२ मध्येही दोन कर्मचाऱ्यांना भेट म्हणून दिली होती कार

आमच्या कंपनीत जवळपास १८० कर्मचारी आहेत. प्रत्येक जण त्यांच्या कामात निपूण आहे. हे सर्व कर्मचारी सर्वसाधारण कुटुंबातील आहे. यापैकी आम्ही अशा काही कर्मचाऱ्यांची निवड करतो, जे त्यांच्या प्रामाणिकपणे आणि समर्पण भावाने काम करतात. आम्ही यापूर्वी काही कर्मचाऱ्यांना अशाप्रकारे कार आणि बाईक भेट म्हणून दिली आहे. २०२२ मध्ये आम्ही दोन कर्मचाऱ्यांना कार भेट दिली होती. त्यानंतर आज आम्ही २८ कर्मचाऱ्यांना कार भेट दिली आहे. यात मर्सिडीज बेन्झसारख्या महागड्या कारचाही समावेश आहे, असे ही कन्नन यांनी सांगितलं.

हेही वाचा – भर वर्गात शिक्षकाच्या पँटमध्ये अडकला किंग कोब्रा; बाहेर काढायला जाताच काढला फणा अन्…VIDEO चा शेवट पाहून उडेल थरकाप

लग्नासाठी कर्मचाऱ्यांना दिले जाते १ लाख रुपये

श्रीधरन कन्नन यांनी पुढे सांगितलं की, आम्ही कार किंवा बाईक भेट देताना एक किंमत ठरवतो. जर एखाद्या कर्मचाऱ्याला कार किंवा बाईक नको असेल, तर त्याला ते पैसे दिले जातात. याशिवाय त्याला दुसरी कोणती गाडी हवी असेल, तर आम्ही ठरवलेल्या पैशांमध्ये काही पैसे टाकून तो त्याला हवी ती गाडी घेऊ शकतो. याशिवाय आम्ही कर्चमाऱ्यांना त्यांना त्यांच्या लग्नासाठीदेखील पैसे देतो. आतापर्यंत आम्ही कर्मचाऱ्यांना लग्नासाठी ५० हजार देत होतो, यावर्षीपासून आम्ही ती रक्कम १ लाख पर्यंत वाढवली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chennai based firm gifted cars and bikes to employees before diwali softnews spb