तामिळनाडूत सुनामी दुर्घटनेला आज अकरा वर्षे पूर्ण झाली असून, ठिकठिकाणी मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली व शांती फेऱ्या काढण्यात आल्या. यात सात हजार लोक मरण पावले होते. चेन्नई, कडलोर, पुदुच्चेरी व नागपट्टीनम येथे या सुनामीचा फटका बसला होता. त्या वेळी इंडोनेशियात सुमात्रा बेटांवर भूकंप झाला होता, त्यामुळे सुनामी लाटा उसळून त्या श्रीलंका व तामिळनाडूमध्ये पोहोचल्या होत्या. या घातक लाटांनी अनेक घरे उद्ध्वस्त झाली होती. या घटनेच्या कटू स्मृती अजूनही ताज्या आहेत. येथील मच्छीमार संघटनांनी प्रार्थना व स्मृती कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मरिना बीच येथे काही कुटुंबांनी सागरात दूध अर्पण केले. चेन्नईतील मच्छीमार आज मच्छीमारीसाठी सागरात गेले नव्हते. नागपट्टीनम जिल्हय़ात सहा हजार लोकांनी प्राण गमावले होते, तेथे एक मिनिट स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. मच्छीमार व्यवसाय मंत्री के. ए. जयपाल व जिल्हाधिकारी एस. पझानिसामी तसेच इतर अधिकाऱ्यांनी मेणबत्ती फेरी काढून पुष्पांजली वाहिली. वैलानकण्णी येथील बॅसिलिकामध्ये सामूहिक प्रार्थना करण्यात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा