पंतप्रधान नरेंद्र मोदी पूरग्रस्त चेन्नईची पाहणी करत असल्याचे छायाचित्र फेक असल्याचे समजल्यानंतर प्रेस इन्फर्मेशन ब्यूरोने (पीआयबी) आपल्या संकेतस्थळावरून ते हटवले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पूर परिस्थितीमुळे चेन्नईचे जनजीवन ठप्प आहे. नरेंद्र मोदींनी गुरूवारी पूरग्रस्त चेन्नईची हवाई पाहणी केली. पीआयबीने आपल्या ट्विटर अकाऊंट आणि संकेतस्थळावर पंतप्रधानांच्या हवाई पाहणीचे एक छायाचित्र जारी केले, पण ते मूळ छायाचित्र नसून त्यात फेरफार केले(फोटोशॉप) असल्याचे नेटिझन्सने लक्षात आणून दिल्यानंतर पीआयबीच्या संकेतस्थळ आणि ट्विटरवरून ते हटविण्यात आले आहे.
मूळ छायाचित्रात मोदी पूरग्रस्त चेन्नईची हवाई पाहणी करताना दाखवण्यात आले असून खिडकीत शेत आणि सर्वत्र पाणी दिसत आहे, पण पीआयबीने ट्विट केलेल्या छायाचित्रात शहराची अवस्था स्पष्ट दाखवण्यासाठी फोटोशॉपच्या मदतीने फोटो एडिट करण्यात आला होता. त्यामुळे खिडकीबाहेर शेताऐवजी पाण्यात बुडालेली घरं दिसत आहेत. पीआयबीने ट्विट केलेल्या या फेक छायाचित्राचा नेटिझन्सने चांगलाच समाचार घेतला. मग, चूक लक्षात आल्यानंतर पीआयबीने ट्विटर आणि संकेतस्थळावरून छायाचित्र हटवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मूळ छायाचित्र-

पूरग्रस्त चेन्नईची पाहणी केलेले नरेंद्र मोदींचे मूळ छायाचित्र.

 

फेरफार केलेले छायाचित्र-

चेन्नईच्या पाहणीचे मोदींचे फोटोशॉप केलेले छायाचित्र.