विश्वनाथन आनंद हे बुद्धिबळात ग्रँडमास्टर राहिलेले एक लोकप्रिय बुद्धिबळपटू आहेत. १९८८ मध्ये त्यांनी पहिल्यांदा भारतासाठी ग्रँडमास्टर हा किताब जिंकला. २८०० च्या एलो रेटिंगला मागे टाकणाऱ्या मोजक्याच खेळाडूंपैकी एक आहेत. हा पराक्रम त्यांनी २००६ मध्ये केला होता. आनंद यांनी पाच वेळा जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे. त्यांनी २००० मध्ये FIDE वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी सहा गेमच्या सामन्यात अलेक्सी शिरोव्हचा पराभव केला आणि २००२ पर्यंत हे विजेतेपद राखले. ते २००७ मध्ये निर्विवाद विश्वविजेता बनले आणि २००८ मध्ये व्लादिमीर क्रॅमनिक, २०१० मध्ये वेसेलिन टोपालोव आणि २०१२ मध्ये बोरिस गेलफँड यांना हरवून विजेतेपद राखले.लहानपणी खेळण्याच्या वेगवान गतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या, आनंद यांनी १९८० च्या सुरुवातीच्या कारकिर्दीत “लाइटनिंग किड” हे नाव कमावले.तेव्हापासून ते उत्तम बुद्धिबळपटू म्हणून ओळखले जातात. याच विश्वनाथन आनंद यांची आज एक्स्प्रेस अड्डावर उपस्थिती आहे. अरुणा आणि अर्जुन एरिगाईसी यांंचीही या कार्यक्रमात उपस्थिती आहे.एक्स्प्रेस’ वृत्तपत्र समूहाचे कार्यकारी संचालक अनंत गोयंका हे त्यांची मुलाखत घेत आहेत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा