राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना जुने आदर्श संबोधलं होतं. राज्यपालांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात एकच असंतोष उफाळला होता. तसेच, राज्यपाल हटाव या मागणीला जोर धरला आहे. याबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनीही आक्रमक भूमिका घेतली होती. यासंदर्भात आज ( ९ नोव्हेंबर ) उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.

पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. उदयनराजे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान झाल्यानंतर २३ नोव्हेंबरला राष्ट्रपती, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहलं होतं. राष्ट्रपती यांच्या सचिवांनी गृहमंत्रालयाकडे पत्र पाठवलं आहे. पंतप्रधान मोदींच्या कार्यालयातही पत्र पाठवण्यात आलं आहे. वाद वाढून, तेढ निर्माण होऊ नये ही भावना आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र आणि देशाची अस्मिता आहे.”

हेही वाचा : “महाराष्ट्रद्रोह्यांना वेळीच आवरले नाही, तर…”; उद्धव ठाकरेंचे शिंदे-भाजपा सरकारवर टीकास्र, गुजरात निवडणुकीवरूनही लगावला टोला

“राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावरून लवकरच तोडगा निघणं आवश्यक आहे. प्रक्रियेनुसार कारवाई होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रकरणाची तीव्रता माहिती आहे. सर्व खासदाराचं राज्यपालांवरील कारवाईबाबत एकमत आहे. भाजपाने राज्यपालांना सांगितलं नाही की, अशी वक्तव्य करा. पण, त्याला पक्ष जबाबदार नाही. राज्यपालांनी अद्यापर्यंत माफी मागितली नाही, ही खंत आहे,” असेही उदयनराजेंनी सांगितलं.

Story img Loader