राज्य व केंद्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी आपलं नशीब आजमावत असताना त्यांना पाठबळ देण्याचं काम छत्तीसगड सरकारकडून केलं जात आहे. भूपेश बघेल सरकारकडून पीएससी अर्थात पब्लिक सर्विस कमिशनसह इतर अनेक स्पर्धा परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. नुकतंच स्वामी आत्मानंद कोचिंग सेंटरचं उद्घाटन मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याहस्ते करण्यात आलं. त्यचावेळी ते बोलत होते. या कोचिंग सेंटरमध्ये NEET-JEE च्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण मिळणार आहे.

या पुढे राज्य सरकारकडून पीएससीसह इतर अनेक स्पर्धा परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले, “JEE कोचिंगनंतर आता सरकार स्पर्धा परीक्षांसाठीही प्रशिक्षण देणार आहे.” स्वामी आत्मानंद कोचिंगसाठी छत्तीसगडमधल्या १४६ विकासखंडव्यतिरिक्त इतर ३ शहरांमध्ये सेंटर्स उघडले जाणार आहेत.

Aditi Tatkare, Ladki Bahin Yojana, Ladki Bahin Yojana Fund, Fund Issue, Aditi Tatkare Pune,
लाडक्या बहीण योजनेसाठी इतर कोणत्याही विभागाचा निधी वळविण्यात आलेला नाही – मंत्री आदिती तटकरे
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Devarpade School, Dada Bhuse Visit Malegaon Taluka ,
मालेगावात शिक्षण मंत्र्यांनी घेतली विद्यार्थी अन् शिक्षकांची ‘शाळा’
Promotion Kalyan Dombivli Municipal corporation,
कल्याण डोंबिवली पालिकेतील ३४३ कर्मचाऱ्यांना पदोन्नत्ती
Women Worli agitation toilets, Mumbai,
मुंबई : वरळीतील महिलांचा शौचालयासाठी आंदोलनाचा इशारा; सागरी किनारा बांधून होतो, पण शौचालयाला मुहूर्त नाही
Maitri Clinic , Clinic , Maitri Clinic for boys and girls,
किशोरवयीन मुला-मुलींसाठी ‘मैत्री क्लिनिक’ ठरतेय आधार! साडे सोळा लाख मुला-मुलींना मार्गदशन…
Delay in recommendation from Group of Ministers in GST Council meeting regarding insurance premiums
विमा हप्त्यांवर दिलासा नाही, जीएसटी परिषदेच्या बैठकीत मंत्रिगटाकडून शिफारशीत दिरंगाई; अन्य मुद्द्यांवर विचारविनिम
CAG report reveals errors in Maharashtras health services from 2016 to 2022
राज्यातील आराेग्य व्यवस्थेवर कॅगचे ताशेरे

या प्रशिक्षण केंद्रांवर विद्यार्थ्यांकडून फक्त परीक्षेची तयारीच करून घेतली जाणार नसून अर्ज भरण्याची प्रक्रियाही त्यांना समजावून सांगितली जाईल. मात्र, दहावीच्या परीक्षेत ६० टक्क्यांहून कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. मोफत प्रशिक्षणासाठी छत्तीसगड सरकारने १०वीमध्ये ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना १२वीचा प्रवेश घेतल्यानंतर कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेण्याची मुभा दिली आहे.

कोटा-राजस्थानमध्ये जमीन खरेदीसाठी पुढाकार

दरम्यान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी राजस्थानमधल्या कोटामध्ये छत्तीसगडच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल बनवण्यासंदर्भात चर्चा केली आहे. यासाठी राजस्थान सरकारकडून २ एकर जमिनीची मागणी करण्यात आली आहे. या जमिनीवर हॉस्टेलचं बांधकाम केलं जाईल. यासाठी छत्तीसगड सरकारने आपल्या अर्थसंकल्पातही तरतूद करून ठेवली आहे.

छत्तीसगड सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले १८९५ कोटी रुपये, २४.५२ लाख लाभार्थी; वाचा काय आहे किसान न्याय योजना!

आत्माराम शाळेत ५ लाख विद्यार्थी घेतायत शिक्षण

दरम्यान, छत्तीसगड सरकारने राज्यात मुलांना मोफत शालेय शिक्षणासाठी शेकडो आत्माराम शाळाही सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यामते या शाळांमध्ये पाच लाख मुलं मोफत शिक्षण घेत आहेत. ते म्हणतात, “बस्तर आणि सरगुजा भागात दोन गोष्टींना भरपूर मागणी आहे. एक तर बँक आणि दुसरी म्हणजे आत्माराम शाळा!”

Story img Loader