पाच राज्यांची रणधुमाळी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यात मंगळवारी ७१.९३ टक्के मतदान झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मतदानाची वेळ संपली असतानाही मतदारांच्या रांगा मतदान केंद्राबाहेर दिसत होत्या. राज्यातील ७२ मतदारसंघात एकूण १०७९ उमेदवार रिंगात असून त्यामध्ये ११९ महिला उमेदवार आहेत.

मतदानाची वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होती. मात्र अमामोरा आणि मोध येथील मतदान केंद्रात सकाळी ७ ते दुपारी ३ अशी मतदानाची वेळ होती. नक्षलवाद्यांकडून आलेल्या धमक्यांमुळे ही वेळ बदलण्यात आली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

काही ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक दोष असल्याचे आढळले, त्यामुळे मतदान प्रक्रियेला थोडा विलंब झाला.