छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यामध्ये कुरेर भागात एक भीषण अपघात झाला आहे. मुलांना घेऊन जाणारा रिक्षा एका ट्रकवर आदळल्यामुळे ही दुर्घटना झाली आहे. या अपघातात सात मुलांचा मृत्यू झाला आहे. यापैकी तीन मुलांचा जागीच मृत्यू झाला असून ४ विद्यार्थी जखमी झाले आहेत.
रिक्षाचा अक्षरश: चुरा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकमध्ये कोरेर भागात मुलांना घेऊन जाणारा रिक्षा थेट ट्रकवर आदळला. या भीषण अपघातात एकूण ७ मुलांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये रिक्षाचा अक्षरश: चुरा झाला आहे. दुर्घटनेनंतर रिक्षाचे भाग रस्त्यावर विखुरले होते.
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख
दरम्यान इतर प्रवाशांनी पोलिसांना तत्काळ फोन करून अपघाताची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत मुलांना तसेच रिक्षा चालकाला रुग्णालयात दाखल केले. मात्र यामध्ये ७ मुलांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी मृत मुलांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.