आपल्या देशात पहिल्यापासूनच प्रथा परंपरांचा पगडा आहे. कित्येक वर्षे जुन्या प्रथा आपल्याकडे आजही सुरू असल्याचं दिसून येतं. काहींचा उगम श्रद्धेतून झाला तर काहींचा उगम काळाची गरज म्हणून झाला. पण अनेक प्रथा आजही सुरू आहेतच. अशीच एक प्रथा छत्तीसगढमध्येही पाहायला मिळाली. या प्रथेसाठी चक्क त्या राज्यातला मुख्यमंत्र्यांनाच चाबकाचे फटके देण्यात आले. काय आहे प्रकरण? जाणून घ्या..

गोवर्धन पूजेच्या परंपरेनुसार मुख्यमंत्री भूपेश बघेल दरवर्षी राज्याच्या मंगलकार्यासाठी, शुभकार्यासाठी आणि अडथळ्यांच्या नाशासाठी कुशापासून बनवलेल्या या चाबकाचा वार सहन करतात. मुख्यमंत्र्यांनी ही परंपरा शुक्रवारी सकाळी जंजगिरी गावात पार पाडली. त्याच्यावर ग्रामस्थ बिरेंद्र ठाकूर याने चाबकाने वार केला आहे. ही प्राचीन परंपरा असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अशा प्रकारे, चाबकाचा प्रहार अडथळ्यांचा नाश करणारा आहे, तसेच आनंद आणि समृद्धी आणणारा आहे, असं मानलं जातं.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांना सांगितले की, दरवर्षी भरोसा ठाकूर वार करत असत. आता ही परंपरा त्यांचा मुलगा बिरेंद्र ठाकूर पाळत आहे. गावकऱ्यांशी झालेल्या चर्चेत ते म्हणाले की, गोवर्धन पूजा ही गोवंशाच्या समृद्धीची परंपरेची पूजा आहे, गोवंश जितका समृद्ध तितकी आपली प्रगती होईल. त्यामुळेच ग्रामीण भागात गोवर्धन पूजा लोकप्रिय आहे. लोक वर्षभर त्याची वाट पाहत असतात, एक प्रकारे ही पूजा गायीप्रती आपल्या कृतज्ञतेचे प्रतीक आहे.

Story img Loader