छत्तीसगडचे मुख्यंमत्री भूपेशसिंह बघेल यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये भूपेश बघेल कँडी क्रश हा मोबाईल गेम खेळत असल्याचं दिसत आहे. यावरून भारतीय जनता पक्षाकडून खोचक शब्दांत टीकाही करण्यात आली आहे. मात्र, त्यावर आता खुद्द भूपेश बघेल यांनीच उत्तर दिलं आहे. आपल्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये भूपेश बघेल यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे.

अमित मालवीय यांची पोस्ट

भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी हा फोटो शेअर करून त्यावर खोचक शब्दांत पोस्ट केली होती. “छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेलही निश्चिंत आहेत. त्यांना माहिती आहे की कितीही डोकं लावलं, तरी सरकार काही येणार नाहीये. कदाचित त्यामुळेच काँग्रेसच्या उमेदवार निवडीच्या संदर्भात बैठकीत लक्ष देण्याऐवजी त्यांना कॅण्डी क्रश खेळणं योग्य वाटलं”, असं अमित मालवीय त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले.

Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Sanjay shirsat marathi news
मंत्री संजय शिरसाट यांचा रोख अब्दुल सत्तारांवर
Ajit Pawar On Chhagan Bhujbal
Ajit Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी…”
Prakash Ambedkar
“RSS ने बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलाला विरोध केलेला”, प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल; म्हणाले, “भाजपा लोकांचं लक्ष वळवण्यासाठी…”
who is Phangnon Konyak
Rahul Gandhi : राहुल गांधींनी प्रतिष्ठेला धक्का पोहचवाल्याचा आरोप करणाऱ्या भाजपाच्या महिला खासदार आहेत कोण?
buldhana protest against home minister amit shah
अमित शहांचा पुतळा जाळला…राष्ट्रमाता जिजाऊंच्या माहेरी जमलेल्या आंदोलकांनी…
Image Of Jagdeep Dhankhar.
Jagdeep Dhankhar : “जग आपल्याकडे पाहत आहे, तरीही आपण…” संसदेतील गदारोळावर राज्यसभेच्या सभापतींची उद्विग्न प्रतिक्रिया

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल सहभागी झाले होते. त्या बैठकीतला हा फोटो असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, हा फोटो बैठक चालू असतानाचा नसून बैठक सुरू होण्यापूर्वीचा असल्याचा दावा खुद्द भूपेश बघेल यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.

काँग्रेस नेते धार्मिक मुद्यांवर का बोलत नाहीत? मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले…

“कॅण्डी क्रशमध्ये मी बऱ्यापैकी लेव्हल पार केल्या आहेत”!

भाजपाकडून लगावलेल्या टोल्यावर भूपेश बघेल यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “आधी भाजपाला आक्षेप होता की मी गेडीवर का चढतो (काठीवर चढून खेळण्याचा एक ग्रामीण खेळ)? भोवरा का खेळतो? विटी-दांडू का खेळतो? इथे छत्तीसगड ऑलिम्पिक का होत आहे? काल एका बैठकीआधी फोटो सापडला की ज्यात मी कॅण्डी क्रश खेळतोय. आता भाजपाला त्यावरही आक्षेप आहे. खरंतर त्यांना माझ्या असण्यावरच आक्षेप आहे. पण कोण राहील आणि कोण जाईल हे तर छत्तीसगडचे लोकच ठरवतात”, असं भूपेश बघेल यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

“मी गेडीवरही चढेन, विटी-दांडूही खेळेन, कॅण्डी क्रशही माझा फेवरेट आहे. यात मी बऱ्यापैकी लेव्हल पार केल्या आहेत. तेही चालूच राहील. बाकी छत्तीसगडला माहिती आहे की कुणाला आशीर्वाद द्यायचाय”, असंही आपल्या पोस्टमध्ये भूपेश बघेल म्हणाले आहेत.

छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यात २० जागांसाठी ७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्याव्यतिरिक्त इतर ७० जागांसाठी १७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

Story img Loader