छत्तीसगढमधील काँग्रेस आमदाराच्या एका वक्तव्याने चर्चेला उधाण आलं आहे. काँग्रेसच्या महिला आमदाराने ‘हिंदू राष्ट्र’ बनवण्याचं आवाहन केलं आहे. तसेच, सर्व हिंदूंनी एकत्र यावं, असेही या महिला आमदाराने सांगितलं आहे. या महिला आमदाराच्या विधानानंतर एकच खळबळ उडाली आहे.
पुरी शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे रायपूर येथे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला धरसीवा विधानसभेच्या आमदार अनिता शर्माही उपस्थित होत्या. तेव्हा अनिता शर्मांनी हे वक्तव्य केलं आहे.
हेही वाचा : अमेरिकेकडून नवतंत्रज्ञान मिळण्याची भारताला आशा, नरेंद्र मोदींच्या नियोजित दौऱ्यात लढाऊ जेट इंजिन करार
अनिता शर्मा म्हणाल्या की, “आपण सर्वांनी कुठेही असलो तरी ‘हिंदू राष्ट्र’ बनवण्यासाठी शपथ घेतली पाहिजे. हिंदूंसाठी आपण बोललं पाहिजे. हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा सर्व हिंदू एकत्र येतील.”
तर, अनित शर्मा यांच्या विधानावर काँग्रेसने हात झटकले आहेत. अनिता शर्मा यांचं विधान व्यक्तिगत आहे,” असं काँग्रेसने म्हटलं आहे.
हेही वाचा : मोदी सरकारमुळे सार्वजनिक उद्योग उद्ध्वस्त- खरगे
अनिता शर्मा यांनी ‘एएनआय’शी बोलताना ‘हिंदू राष्ट्र’ या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. “देशात विविध धर्माचे लोक एकोप्याने राहतात. आम्हाला कोणाच्यातही फूट पाडायची नाही. भाजपाचे लोक समाजात फूट पाडण्याचं काम करतात. पण, आमचे नेते ( राहुल गांधी ) सर्वांना एकत्र आणण्यासाठी ‘भारत जोडो’ यात्रा काढतात,” असं अनिता शर्मा यांनी सांगितलं आहे.