छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात काँग्रेसचे काही नेते मृत्युमुखी पडले असतानाच नक्षलवाद्यांना न घाबरता परिवर्तन यात्रा पुढे सुरू करण्याचे काँग्रेसने ठरवले आहे. जिराम घाटी जवळच्या केसलूर खेडय़ातून ही परिवर्तन यात्रा पुढे चालू होईल. ही यात्रा पुन्हा सुरू झाल्यानंतर ६ जूनला सर्व जिल्हा मुख्यालयात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल, त्यांचा मुलगा दिनेश व माजी विरोधी पक्षनेते महेंद्र कर्मा, आमदार उदय मुदलियार यांच्यासह सर्व मृतांना श्रद्धांजली वाहण्यात येईल. बस्तर जिल्ह्य़ातील बस्तर, दान्तेवाडा, विजापूर, नारायणपूर, सुकमा व कंकेर येथे मात्र श्रद्धांजलीचे कार्यक्रम होणार नाहीत.
दरम्यान, छत्तीसगड सरकारच्या बरखास्तीच्या मागणीसाठी राज्यातील काँग्रेसच्या आमदारांनी दबावतंत्र अवलंबिले असून प्रसंगी सामूहिक राजीनामे देण्याचा प्रस्ताव त्यांनी श्रेष्ठींसमोर मांडला आहे.
काँग्रेसची परिवर्तन यात्रा पुन्हा सुरू होणार
छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात काँग्रेसचे काही नेते मृत्युमुखी पडले असतानाच नक्षलवाद्यांना न घाबरता परिवर्तन यात्रा पुढे सुरू करण्याचे काँग्रेसने ठरवले आहे. जिराम घाटी जवळच्या केसलूर खेडय़ातून ही परिवर्तन यात्रा पुढे चालू होईल.
First published on: 03-06-2013 at 12:49 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhattisgarh congress to resume parivartan yatra from ambush site