‘एकनाथ शिंदेंप्रमाणे आमदार फोडा आणि मुख्यमंत्री व्हा’ अशी ऑफर छत्तीसगडचे कोळसा व्यापारी सूर्यकांत तिवारी यांना आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्याचा दावा केलाय. आयकर विभागाचे छापे पडल्यानंतर सूर्यकांत यांनीच हे आरोप केले आहेत. राज्यामध्ये सत्तांतर घडवून आणण्याचा कट रचला जात असून छापेमारीच्या माध्यमातून हे प्रयत्न सुरु असल्याचा आरोप त्यांनी केलाय. ३० जून रोजी आपल्या मालमत्तेवर आयकर विभागाने छापेमारी केली. यावेळेस काही अधिकाऱ्यांनी आपल्यावर दबाव टाकून राज्यातील ४० ते ४५ आमदारांची यादी तयार करावी असं सांगितल्याचा दावा सुर्यकांत यांनी केलाय. काही अपक्ष आमदारांच्या मदतीने राज्यात सत्तापालट घडवून आणावा. असं केल्यास तुम्हाला मुख्यमंत्री केलं जाईल, अशी ऑफर देण्यात आल्याचं सूर्यकांत यांनी म्हटलंय. मी छत्तीसगडमधील एकनाथ शिंदे व्हावं म्हणून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी साऱ्या गोष्टी करुन पाहिल्याचा आरोप सूर्यकांत यांनी केला आहे.
नक्की पाहा >> Photos: “मला वाटतं त्यांचं…”; २०० जागा जिंकण्याच्या CM शिंदेंच्या दाव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया ऐकून पिकला एकच हशा
डॉ. रमण सिंह या साऱ्या प्रकरणाला राजकीय रंग देत आहेत. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन दिवस आपल्याला सुखाने झोपू दिलं नाही. आपला मानसिक छळ करण्यात आल्याचा दावा सूर्यकांत यांनी केलाय. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्याच्या सचिवालयामधील उपसचिव सौम्या चौरसियाचं नाव तुमच्या कोळसा उद्योगाशी संबंधित आहे असं दाखवावं, यासाठी आपल्यावर दबाव निर्माण केल्याचा आरोप सूर्यकांत यांनी केलाय. सौम्या चौरसिया आणि सूर्यकांत यांचे कौटुंबिक संबंध असून याच कारणामुळे त्यांना लक्ष्य करण्यात आल्याचंही सांगितलं जातंय. रायपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना सूर्यकुमार यांनी हे आरोप केलेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा