नवी दिल्ली : छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी पहिल्या टप्प्यातील मतदान होत असताना सट्टेबाजीला प्रोत्साहन देणाऱ्या ‘महादेव बेटिंग अॅप’ घोटाळय़ावरून सोमवारी काँग्रेस आणि भाजप एकमेकांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्ती व अटकेची कारवाई सुरू केली असली तरी, छत्तीसगडमधील मतदानाआधी चार दिवस ही कारवाई कशी केली जाते? दोन दिवस आधी अॅपवर बंदी आणण्याची शिफारस कशी केली जाते, असा प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी मंगळवारी केला. ईडी व भाजपचे संगनमत असून निवडणुकीच्या काळात कारवाया करून सत्ताधारी पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याद्वारे मतदारांवर प्रभाव टाकला जात असून निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करण्याची मागणी काँग्रेसने केली.
भेट लांबणीवर
काँग्रेसने शनिवारी ४ नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाला वेळ मागितली होती. त्यानुसार, सोमवारी ६ तारखेला संध्याकाळी साडेचार वाजता ही वेळ देण्यात आली होती. मात्र, अचानक ही भेट रद्द करण्यात आली असून ८ वा ९ नोव्हेंबर रोजी भेटीसाठी यावे, असा निरोप पाठवला गेला आहे, असे सिंघवी यांनी सांगितले.
हेही वाचा >>> इंडिया आघाडीत बिघाडी? अखिलेश यादव यांची काँग्रेसवर सडकून टीका; म्हणाले…
महादेव अॅप ब्लॉक केला असला तरी, व्हॉट्सअप व इन्स्टाग्रामवर सट्टेबाजी सुरू असून देशभर केंद्राने सट्टेबाजीवर बंदी आणली पाहिजे, अशी मागणी बघेल यांनी केली आहे. शुभम सोनी याने बघेल यांना ५०८ कोटी दिल्याचा दावा केला असला तरी, दुबईतून पैसे पाठवले जात असतील तर केंद्राच्या अखत्यारितील कस्टम विभाग काय करत होता? त्यांनी पैशांची अवैध देवाण-घेवाण कशी रोखली नाही? असा सवाल सिंघवी यांनी केला.
पूर्वीच मागणी केल्याचा काँग्रेसचा दावा
मात्र, चंद्रशेखर यांचा दावा काँग्रेसने फेटाळला असून २४ ऑगस्ट रोजी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत भूपेश बघेल यांनी महादेव अॅपवर बंदी घालण्याची मागणी केली होती, असे काँग्रेसचे माध्यमप्रमुख जयराम रमेश यांनी सांगितले.
‘अॅपवर बंदी न घालण्याला बघेल जबाबदार’
* महादेव बेटिंग अॅपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर व रवी उप्पल यांच्या अवैध व्यवहारांची ‘ईडी’ दीड वर्षे चौकशी करत आहे.
* शुभम सोनी याने छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना ५०८ कोटी दिल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी बघेल संशयाच्या फेऱ्यात अडकले आहेत.
* केंद्रीय माहिती व तंत्रज्ञानमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सोमवारी महादेव अॅपवर तातडीने बंदी न घालण्याचे खापर बघेल यांच्यावर फोडले.
* ‘ईडी’ने सूचना केल्यावर केंद्राने महादेव अॅपसह २२ इतर अॅप ब्लॉक केले असे चंद्रशेखर म्हणाले.
मिझोरममध्ये आज मतदान
नवी दिल्ली : मिझोराम विधानसभा निवडणुकीसाठी आज, मंगळवारी मतदान होत असून, छत्तीसगड विधानसभेसाठीही आज पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे.
४० सदस्यांच्या मिझोराम विधानसभेसाठी १७४ उमेदवार मैदानात असून, ८.५७ लाखांहून अधिक मतदार मतदानास पात्र आहेत. राज्यातील १२७६ मतदान केंद्रांवर सकाळी सात ते दुपारी चार या वेळेत मतदान होणार आहे.
छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात आज मतदान होत असलेल्या २० मतदारसंघांपैकी अनेक नक्षलग्रस्त बस्तर विभागात आहेत. यापैकी दहा मतदारसंघांत सकाळी सात ते दुपारी तीन या वेळेत, तर उर्वरित दहा मतदारसंघांमध्ये सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होईल.
मित्रपक्षांकडूनच काँग्रेसच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह; शिवराज सिंह चौहान यांचा टोला
भोपाळ: काँग्रेसचे रूपांतर ‘दलदलीत’ झाले असून, इंडिया आघाडी त्यात फसली आहे, असे वक्तव्य मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सोमवारी केले आणि पक्षाच्या नेत्या प्रियंका गांधी वढेरा यांनी ‘स्पष्टीकरण’ देण्याची मागणी केली.
काँग्रेसने पूर्वी जातिआधारित जनगणना आणि मंडल आयोगाची अंमलबजावणी रोखली होती, असा आरोप यादव यांनी आदल्या दिवशी केला होता. ‘इंडिया आघाडीचा भाग असलेले सप आणि आम आदमी पक्ष मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत एकमेकांशी का भांडत आहेत, असे मी प्रियंकाजींना विचारू इच्छितो. दिल्लीत मैत्री आणि राज्यांमध्ये कुस्ती यासारखा हा प्रकार आहे,’ असे चौहान सिंगरौली येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. आघाडीतील मित्रपक्ष फक्त काँग्रेसला शाप देत असून तो विश्वासार्ह पक्ष नसल्याचे म्हणत आहेत,’ असेही त्यांनी सांगितले.