Chhattisgarh Killings in Suspicion of Practising Witchcraft : छत्तीसगडमध्ये आदिवासीबहुल सुकमा जिल्ह्यातील एका गावात रविवारी एक संतापजनक घटना घडली आहे. रविवारी (१५ ऑक्टोबर) येथील दोन दाम्पत्यांसह एका महिलेची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आल्याचं प्रकरण समोर आलं आहे. पोलिसांनी सांगितलं की, जादू-टोणा केल्याच्या संशयातून या हत्या करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी याप्रकरणी एकाच गावातील पाच आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी केली जात आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने या घटनेची माहिती देताना सांगितलं की ही घटना कोंटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या एका गावात घडली आहे. मौसम कन्ना (३४) व त्याची पत्नी मौमस बिरी, मौसम बुच्चा (३४) व त्याची पत्नी मौसम आरजू, तसेच आणखी एक महिला काका लच्छी (४३) अशी या घटनेतील पाच मृत व्यक्तींची नावं आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

घटनेची माहिती मिळताच एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासह कोंटा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांकडे चौकशी केल्यानंतर व सुरुवातीच्या टप्प्यात मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी सवलम राजेश (२१), सवलम हिडमा, करम सत्यम (३५), कुंजम मुकेश (२८) व पोडियाम एंका या पाच जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी चालू आहे. तसेच पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

हे ही वाचा >> Kolkata Rape Case : कोलकात्यातील रुग्णालयात आजारी मुलाच्या आईचा विनयभंग, वॉर्डबॉयने झोपलेल्या महिलेला पाहून…

एकाच आठवड्यात जादूटोण्याच्या संशयातून नऊ हत्या

अशाच प्रकारची आणखी एक घटना छत्तीसगडमधील बलौदाबाजार-भाटपारा जिल्ह्यात गुरुवारी घडली होती. यामध्ये काही लोकांनी मिळून जादू-टोण्याच्या संशयातून एका ११ महिन्यांच्या बाळासाह एका कुटुंबातील चार जणांची हत्या केली होती. पोलीस या प्रकरणाचा देखील तपास करत आहेत. एकाच आठवड्यात जादूटोण्याच्या संशयातून छत्तीसगडमध्ये नऊ जणांच्या हत्या झाल्या आहेत.