कुख्यात गुंड छोटा राजन याला भारतात आणण्याच्या हालचालींना वेग आला असून छोटा राजनचा ताबा मिळवण्यासाठी सीबीआय, मुंबई आणि दिल्ली पोलिसांचे एक संयुक्त पथक इंडोनेशियात दाखल झाले आहे. छोटा राजनवर बँकॉकमध्ये हल्ला झाला तेव्हा त्याचा ताबा घेण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक तेथे गेले होते. या पथकाने छोटा राजनवरील सर्व गुन्ह्य़ांची माहिती पुरविल्यानंतर तोच पळून गेल्याने भारताच्या ताब्यात आला नव्हता.
आता गुन्हेगार प्रत्यार्पण प्रक्रियेत न अडकता छोटा राजनला भारतात पाठविण्याची प्रक्रिया सुरू व्हावी, यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे गुप्तचर विभागातील सूत्रांनी सांगितले. येत्या दोन दिवसांत छोटा राजनला भारतात आणण्यात येईल,अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. छोटा राजनचा ताबा मिळवण्यासाठी जाणाऱया पथकाला इंडोनेशियात धोका असल्याची शंका व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर भारत सरकारने स्थानिक अधिकाऱयांनी संपर्क साधून भारतीय पथकाला संरक्षण देण्याची विनंती केली. यावर इंडोनेशियानेही सहकार्यकरीत सुरक्षेची हमी दिल्यानंतर हे पथक रवाना झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा