भारतीय पोलिसांच्या पथकाने कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याची सोमवारी पहिल्यांदा चौकशी केली. त्याला येत्या दोन- तीन दिवसांत भारतात प्रत्यार्पित केली जाण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ऑस्ट्रेलियाहून २५ ऑक्टोबरला बाली या प्रख्यात पर्यटनस्थळी पोहचताच अटक करण्यात आलेल्या छोटा राजनला लवकरच एका न्यायालयात हजर करण्यात येईल अशी अपेक्षा असून, राजन हा भारतात ज्या गुन्ह्य़ांमध्ये ‘हवा’ आहे, त्यांची विस्तृत माहिती इंडोनेशियन पोलीस तेथे सादर करतील. राजनचा लवकरात लवकर ताबा मिळावा यासाठी भारतीय पोलीस पथक इंडोनेशियन पोलीसमधील आपल्या समपदस्थांसोबत काम करत आहे.
छोटा राजन याच्या भारतात प्रत्यार्पणाला त्याच्या वकिलांनी विरोध केला नाही, तर आम्ही त्याला येथे आलेल्या भारतीय पोलीस पथकाच्या ताब्यात सोपवू. ही संपूर्ण प्रक्रिया येत्या दोन-तीन दिवसांत पूर्ण होईल. तथापि, वकिलांनी प्रत्यार्पणास विरोध केल्यास ही प्रक्रिया लांबू शकते, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. राजन याने फ्रान्सिस्को प्रास्सार यांना त्याचे वकील नेमले आहे. सीबीआय, तसेच मुंबई व दिल्ली पोलीस यांचा समावेश असलेले भारतीय पथक रविवारी इंडोनेशियात येऊन पोहचले. ५५ वर्षांचा राजन व भारतातील विविध गुन्ह्य़ांमध्ये त्याचा संबंध याबाबत त्यांनी सविस्तर माहिती आणली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा