कुख्यात गुंड छोटा राजनच्या मुसक्या आवळण्याचे श्रेय आपले असल्याचा दावा त्याचा प्रतिस्पर्धी छोटा शकीलने केल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. माझे हस्तक गेल्या काही दिवसांपासून फिजीमध्ये छोटा राजनच्या मागावर होते. राजनच्या तेथील सर्व तळांवर आम्ही ताबा मिळवला त्यामुळेच त्रस्त होऊन राजनला इंडोनेशियात पळ काढणे भाग पडले आणि त्याला तेथे अटक झाली, असे छोटा शकीलने म्हटले आहे. मात्र, छोटा राजनच्या अटकेबद्दल आपण आनंदी नसल्याचेही छोटा शकीलने सांगितले. छोटा राजनच्या अटकेवर डी कंपनी आनंदी नसून आमचे शत्रूत्व येथे संपत नाही. त्याची अटक हा आमचा विषय नाही. शत्रूला संपवणे हा आमचा हेतू अतिशय स्पष्ट आहे. तो कोठेही असला तरीही आम्ही त्याला सोडणार नाही. छोटा राजनविरोधातील आमच्या कारवाया सुरूच राहतील, असा इशारा छोटा शकीलने दिला आहे. इतकेच नाही तर, आमचा भारत सरकारवर विश्वास नसून ते छोटा राजनचे लाड पुरवतील आणि आमच्याविरुद्ध त्याची मदत घेतील, असे म्हणत छोटा शकीलने भारत सरकार छोटा राजनची चौकशी करून त्याला फासावर चढवतील याची काय शाश्वती?, असा सवाल उपस्थित केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा