कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याला गँगरिन झाल्याच्या बातम्यांचा त्याचा सहकारी छोटा शकील याने इन्कार केला आहे. त्याल गँगरिन झाले असून तो चालू फिरू शकत नाही अशा बातम्या आल्या होत्या त्यावर तो तंदुरुस्त असल्याचे शकीलने सांगितले. डी कंपनीचे उद्योगव्यवसायातील हितसंबंध धोक्यात आणण्याचे कारस्थान काही लोकांनी चालवले असून त्यामुळेच या अफवा पसरवण्यात आल्या असे सांगून छोटा शकील म्हणाला की, आपकी एजन्सीज के पास गलत खबर हैं, ये सब रूमर्स हैं. भाई बिलकुल फिट हैं, सेहतमंद हैं.
कराचीच्या क्लिफॉन भागात काही डॉक्टर्स दिसले होते व तेथेच दाऊद राहतो व त्यांनी दाऊदचा पाय कापण्याचा विचार सुरू केला आहे कारण त्याला गँगरिन झाले असून विष शरीरात पसरत आहे, अशा बातम्या आल्या होत्या. लियाकत नॅशनल हॉस्पिटल व लष्करी रुग्णालय यांचे ते डॉक्टर होते.
जास्त रक्तदाबामुळे रक्तपुरवठा न झाल्याने व रक्तशर्करा वाढल्याने दाऊदला गँगरीन झाल्याचे सांगण्यात आले होते. दाऊदची कराचीत दोन ते तीन घरे आहेत तेथे तो सुरक्षित आहे. व्हाइट हाउस- क्लिफॉन; घर नंबर ३७, तिसावा रस्ता- डिफेन्स हाउसिंग अथॉरिटी व नूराबाद भागातील बंगला ही दाऊदची तीन घरे आहेत. तो तेथून उद्योग व्यवसाय करतो.

Story img Loader